Sunday, October 7, 2012

पुन्हा गोष्ट लोकलमधली...८

"सुस्वागतम , सुस्वागतम ,

सरस्वती विद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलनात आपल्या सर्वांच स्वागत आहे..
मी मालिनी देशपांडे आपले सगळ्यांचे स्वागत करते..
सर्वप्रथम मी आजचे प्रमुख पाहुणे श्री. रोहित आणि सौ. नेहा गोरे ह्यांना दीप प्रज्वलन करण्याची विनंती करते.."

हे सगळ मला अगदी वेगळ वाटत होत....नेहमी स्टेजच्या खाली बसून गप्पा मारणारा....कधीही भाषण म्हणल, लोकांसमोर बोल म्हणल की नेहमी नाही म्हणणारा....आज त्याच स्टेज वर प्रमुख पाहुणे म्हणून आला होता आणि बोलणार पण होता...मी आणि नेहा दोघही दीप प्रज्वलन करायला उठलो....नेहा नेहमीप्रमाणेच तिथे असणाऱ्या सगळ्या बायकांमध्ये उठून दिसत होती...तिने गर्द हिरव्या रंगाची साडी नेसली होती...हातात मी दिलेलं ब्रेसलेट घातलं होत...केस काहीतरी वेगळ्याच पद्धतीने बांधले होते......नाकातली मोरणी त्या फोकस लाइट्स मध्ये चकाकत होती.... थोडक्यात काय ती सुंदर दिसत होती......दीप प्रज्वलन झालं...आणि परत मालिनी देशपांडे बोलू लागल्या

"विद्यार्थ्यांनो,

  आजचा दिवस खूप खास आहे...कारण आज आपण गोष्ट ऐकणार आहोत...एका खूप वेगळ्या माणसाकडून
त्यांची ओळख करून देयला मी बोलावते निमगावकर सरांना"
 टाळ्या वाजल्या....आणि निमगावकर सर बोलू लागले..

"मित्रांनो,

आज आपल्याला जे व्यक्तिमत्व प्रमुख पाहुणे म्हणून लाभल आहे...ते फार वेगळ आहे....काही वर्षांपूर्वी अशाच स्नेहसंमेलनात कविता म्हण म्हणून ज्याच्या आम्ही सगळे खूप मागे लागलो होतो....तोच हा रोहित गोरे......त्याने खास मला सांगितलं की सर मला आहो जाहो म्हणू नका....म्हणून मी एकरांत बोललो....त्याने आयुष्यात खूप काही मिळवलं, engineering, M.tech ते पण IIT मधून.....पण असं असूनही त्यानी त्याची लिखाणाची आवड तशीच जपली आहे...हे मला तेव्हा कळलं जेव्हा मी त्याचा ब्लॉग वाचला....त्याचक्षणी मी ठरवलं होत की त्यालाच बोलवायचं ह्यावेळी स्नेहसंमेलनात प्रमुख पाहुणे म्हणून....
आणि मुलांनो गोष्ट झाल्यावर तुम्ही त्याला प्रश्न विचारायचे आहेत.....तेव्हा आता जास्त वेळ न घेता मी सरळ माईक रोहितच्या हवाली करतो...."

पुन्हा टाळ्यांचा कडकडाट झाला...मी माईक जवळ गेलो.....आणि पहिला शब्द उच्चारला...

"आई "






No comments:

Post a Comment