काळ ....सरत जाणारा.....
आयुष्यात रुतत जाणारा...
क्षणांशी स्पर्धा करणारा ....काळ
पक्ष्यांसवे सरकन उडणारा...
सरींसवे चिंब भिजणारा
अनोळखी वाटेवरती हात हाती देणारा ....काळ
क्षितीजापारी अथांग असणारा...
समुद्रापरी निवांत असणारा
वाऱ्याच्या प्रत्येक लाटेवरती वाहणारा ......काळ
डोळ्यातली सारी स्वप्नं जाणणारा
घडणारी हर गोष्ट पाहणारा...
जीवनातली प्रत्येक वेळ जगणारा.....काळ.
काळ.....नेहमी वेळेबरोबर राहणारा...
घड्याळाबरोबर घडणारा
नकोतीथे...नको त्यावेळी बदलणारा.....काळ.....
- सौनिक
Sunday, July 7, 2013
Monday, June 3, 2013
तू रे....
तू
रे.....
मनातले
हे भाव तू रे...
डोळ्यातले
ते गाव तू रे ....
अनोळखीसे
नाव तू रे....
तू
सखा अन तूच तू रे...
ओठातले
ते गीत तू रे
स्पर्शातले
ते स्मित तू रे
गाजलेली
रीत तू रे....
तू
सखा तूच तू रे.....
दाटलेले
मेघ तू रे
वाटलेले
प्रेम तू रे
गुंतलेले
श्वास तू रे.....
तू
सखा तूच तू रे....
कल्पनांची
वाट तू रे
भावनांची
गाठ तू रे...
पेटलेली
वात तू रे....
तू
सखा अन तूच तू रे.....
आज
तू अन काल तू रे
अनंत
तू नि अंत तू रे....
दान
तू वरदान तू रे
तू
सखा अन ईश तू रे.....
तू
सखा अन तूच तू रे.....
- सौनिक ....
Thursday, February 7, 2013
सांजवेळा.....
मनाशी बोलणाऱ्या.....स्वतःला मांडणाऱ्या
एकट्याला एकट्याशी बांधणाऱ्या...........सांजवेळा
ह्या जीवांना आस असते भेटण्याची
अंतरीचे भाव सारे सांगण्याची
ह्या मनाला त्या मनाशी जोडणाऱ्या ......सांजवेळा
दाटलेले दुःख येते मग भरून
मन असते हात-हाती अन धरून
अश्रूंनाही हासवून सांडणाऱ्या..........सांजवेळा
विसकटलेल्या भावनांना सावरून
मन म्हणते बघ जरा निरखून
तुझे निरोप तिलाही सांगणाऱ्या .....सांजवेळा....
Sunday, January 6, 2013
पुन्हा गोष्ट लोकलमधली - १२
डिसेंबर महिना चालू होता...आम्ही नुकतच त्या स्नेह्संमेलनाला जाऊन आलो होतो....मी आणि नेहा नेहमीप्रमाणे ऑफिसहून परत आलो होतो...आईने आमच्यासाठी मस्त चहा केला होता.... तो देत ती म्हणाली...
"रोहित...आज काय, कसं झाल ऑफिस ?
मस्त झाल आई....आग आई....आज कोणाचा फोन आला होता माहितीये?
कोणाचा रे ?
अग आशिष ....आम्ही त्याला जाड्या म्हणायचो .... नाही का .तो माझ्याबरोबर होता ...
हो हो... काय म्हणतोय तो..? काय करतो सध्या...
काही नाही ग.... बंगलोरला असतो...नौकरी करतो
बर ....अरे वा....मग लग्न कुठे आहे....? बंगलोरला?
नाही....जयपूरला .....आपल्या सगळ्यांना बोलावलंय...
काय जयपूर? एकदम जयपूर कस?
मुलगी जयपूरची आहे...
नेहा म्हणाली.... love marriage असेल....आई...त्याच....
नाही....नाही....arrange आहे
बर बर....कधी आहे लग्न...?
३० डिसेंबरला आहे....आपल्याला जायचय....
हो आपण ह्यावेळी....आई बाबांना पण घेऊन जाऊ.... नेहा म्हणाली...
हो ते तर आहेच.....आई तु तयारीला लाग....बाबांना पण सांग...
अरे पण.....आम्ही कशाला....
नाही तुम्ही येणार आहात....." अस म्हणून मी स्वयंपाकघरात पाणी पेयला गेलो...तोच मला ह्या दोघींच्या गप्पा ऐकू येवू लागल्या....
" आई , जयपूरला साड्या खूप छान मिळतात , चपला पण खूप छान मिळतात , लग्न तर फक्त कारण आहे....आपण मस्त शॉपिंग करू तिथे.....
नेहा अगदी मनातल बोललीस बघ...आम्ही गेलो होतो रोहित लहान असताना जयपूरला पण तेव्हा तो नेमका तिथे आजारीच पडला....आणि आमच सगळ शॉपिंग राहील होत....पण, हो रोहित एकटा गेला होता तेव्हा त्यानी माझ्यासाठी खूप सुंदर साडी आणली होती....खरच....आपण खूप शॉपिंग करू....तिथे "
मी पाणी पीत पीत विचार करू लागलो ....काय हे जाड्यानी ठेवून ठेवून लग्न जयपूरलाच का ठेवलाय..?
"रोहित...आज काय, कसं झाल ऑफिस ?
मस्त झाल आई....आग आई....आज कोणाचा फोन आला होता माहितीये?
कोणाचा रे ?
अग आशिष ....आम्ही त्याला जाड्या म्हणायचो .... नाही का .तो माझ्याबरोबर होता ...
हो हो... काय म्हणतोय तो..? काय करतो सध्या...
काही नाही ग.... बंगलोरला असतो...नौकरी करतो
बर ....अरे वा....मग लग्न कुठे आहे....? बंगलोरला?
नाही....जयपूरला .....आपल्या सगळ्यांना बोलावलंय...
काय जयपूर? एकदम जयपूर कस?
मुलगी जयपूरची आहे...
नेहा म्हणाली.... love marriage असेल....आई...त्याच....
नाही....नाही....arrange आहे
बर बर....कधी आहे लग्न...?
३० डिसेंबरला आहे....आपल्याला जायचय....
हो आपण ह्यावेळी....आई बाबांना पण घेऊन जाऊ.... नेहा म्हणाली...
हो ते तर आहेच.....आई तु तयारीला लाग....बाबांना पण सांग...
अरे पण.....आम्ही कशाला....
नाही तुम्ही येणार आहात....." अस म्हणून मी स्वयंपाकघरात पाणी पेयला गेलो...तोच मला ह्या दोघींच्या गप्पा ऐकू येवू लागल्या....
" आई , जयपूरला साड्या खूप छान मिळतात , चपला पण खूप छान मिळतात , लग्न तर फक्त कारण आहे....आपण मस्त शॉपिंग करू तिथे.....
नेहा अगदी मनातल बोललीस बघ...आम्ही गेलो होतो रोहित लहान असताना जयपूरला पण तेव्हा तो नेमका तिथे आजारीच पडला....आणि आमच सगळ शॉपिंग राहील होत....पण, हो रोहित एकटा गेला होता तेव्हा त्यानी माझ्यासाठी खूप सुंदर साडी आणली होती....खरच....आपण खूप शॉपिंग करू....तिथे "
मी पाणी पीत पीत विचार करू लागलो ....काय हे जाड्यानी ठेवून ठेवून लग्न जयपूरलाच का ठेवलाय..?
Thursday, January 3, 2013
पुन्हा गोष्ट लोकलमधली - ११
मग एक मुलगी उठली.....माईक हातात घेतला आणि म्हणाली...
"माझा प्रश्न रोहित सर आणि नेहा madam दोघांसाठी आहे......सर तुम्ही नेहा nadam च जे वर्णन करता गोष्टींमध्ये.....ते खरच खूप छान असत.....तुम्हाला नेहा madam मधली सगळ्यात नावडती गोष्ट कोणती आहे.... आणि madam तुम्हाला सरांची सगळ्यात कोणती गोष्ट आवडते....?"
" बाळ, तुझ नाव काय?...खरच खूप मस्त प्रश्न विचारला आहेस"....नेहा म्हणाली....
" माझं नाव जिगीषा कुरुंदकर ....."
" जिगीषा पहिला प्रश्न सरांसाठी आहे तर पहिल्यांदी तेच उत्तर देतील अस म्हणून नेहानी माझ्याकडे माईक दिला....मला मात्र चांगल कोड्यात टाकल होत त्या प्रश्नानी....मी म्हणल....
"जिगीषा....आवडती गोष्ट सांगू का? खूप आहेत.....नावडत्या नाहीच आहेत.....असो....पण एक गोष्ट आहे कि जी मला आजीबात आवडत नाही नेहा मधली ती म्हणजे.....तीच माझ्यावर असणार प्रेम कि जे माझं तिच्यावर असणाऱ्या प्रेमापेक्षा कितीतरी पटींनी जास्त आहे....तिचा माझ्यावर असणारा विश्वास हा माझा तिच्यावर असणाऱ्या विश्वासापेक्षा कितीतरी पटींनी जास्त आहे......तिला हे सगळ सहज जमत.....आणि ते मला आवडत नाही.....कारण माझं तिच्यावर खूप प्रेम आहे....पण हे सगळ मला लिहून दाखवाव लागल लोकांना पण ती तिच्या वागण्यातूनच लोकांना दाखवून देते.... मला वाटत तुला मिळाल असेल उत्तर आता "
"हो सर.....आता madam तुमचं उत्तर "
"जिगीषा....माझी आवडती गोष्ट .... रोहितमधली....ती म्हणजे.....त्याचा साधेपणा.....आणि हो सगळ्यात महत्वाच म्हणजे....."नेहा".....कारण.....रोहित नेहाशिवाय अपूर्ण आहे आणे नेहा रोहितशिवाय....".
पुन्हा टाळ्या कडाडल्या.......परत माईक शेगावकर सरांकडे आला....
"हा आता शेवटचा प्रश्न कोण विचारणार आहे....
"सर मी सर मी".....अस म्हणून एक मुलगा पुढे आला....
"माझा प्रश्न रोहित सरांसाठी आहे ....सर सौनिक म्हणजे काय?"
"सौनिक...मुलांनो....मी फक्त आता तुम्हाला एवढंच सांगू शकेन....कि लहानपणापासून...आपल्या मनात असंख्य गोष्टी घडत असतात ......पण त्या प्रत्यक्षात घडतातच अस नाही......त्या सगळ्या अप्रत्यक्ष मनातल्या गोष्टी म्हणजे...."सौनिक".....असच तुमचं प्रेम.....माझ्यावर राहू द्या...भरपूर वाचा.....हसा, खेळा हो पण तेवढाच अभ्यासही करा....Wish you all the best for your future.... धन्यवाद "
Monday, December 31, 2012
पुन्हा गोष्ट लोकलमधली - १०
परत निमगावकर सर व्यासपिठावर आले....आणि म्हणाले....रोहित तू सांगितलेल्या गोष्टी मुलं नक्की लक्षात ठेवतील...तू सांगितलेलं अगदी खर आहे ....आजची पिढी हे सगळ विसरली आहे....त्यांच्यासाठी ह्या गोष्टी खरच खूप महत्वाच्या आहेत...असो....आता मुलांनो....तुमची टर्न.....आर्थात उत्स्फूर्त संवाद ......तुम्ही मोकळे आहात आता आजच्या आपल्या प्रमुख पाहुण्यांना प्रश्न विचारायला...आणि हो..... नुसतं रोहित सरांनाच नाही तर नेहा ताईंना पण विचारा....पहिला प्रश्न कोण विचारणार आहे? हम्म आकाश विचार..
आकाश जवळ एक मुलगा माईक घेवून गेला ... आकाश म्हणाला
" माझा प्रश्न रोहित सरांसाठी आहे...सर, तुम्ही एवढा सगळ लिहित होता.....त्याबरोबर आयआयटी मध्ये अभ्यास कसा सांभाळत होता?.."
मी म्हणालो " आकाश ....तू प्रश्न चांगला विचारला आहेस...पण तुला मी सांगतो कि हे सगळ मी लिहित गेलो तो माझा छंद म्हणून....आणि जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट छंद म्हणून करता तेव्हा ती तुमच्या आभ्यासाच्या कधीच मध्ये येत नाही....पण हा...जर तुम्ही अभ्यास नको म्हणून जर सारखी ती गोष्ट करायला लागलात तर मग आवघड आहे...तेव्हा तात्पर्य काय...कि छंदाला छंदच राहू द्या....त्याची सवय करू नका.......कळल ??"
" हो सर....कळल ना...." आकाश म्हणाला...
बऱ्याच मुलांनी प्रश्न विचाराय्साठी हात वर केले होते.....मग केतकी उठली आणि तिने विचारल...
"माझा प्रश्न नेहा madam साठी आहे , madam, तुम्ही खरच प्रथम लोकलमध्ये भेटलात का सरांना ? आणि तेव्हाचे सर आणि आत्ताचे सर ह्यात काही फरक वाटतो का तुम्हाला?"
नेहानी माझ्याकडून माईक घेतला......आणि ती म्हणाली....
"नमस्कार मुलांनो....तुम्ही खरच सगळे खूप गोड आहात....खूप शांत पण आहात...आम्ही आमच्या शाळेत इतके कधीच शांत बसत नव्हतो....असो....केतकी......तू वाचलीयेस का गोष्ट लोकलमधली ?"
"हो madam...."
बर...पण केतकी.....हि गोष्ट खारीये कि मी रोहित सरांना लोकलमधेच भेटले....पण तुला मी खर सांगते कि तेव्हा मला वाटलच नव्हत कि आपण हे सगळ काही जगतो आहो ते रोहित डोक्यात साठवतोय आणि ते तो लिहून काढणार आहे....त्यातल्या लेखकाला मी तेव्हा भेटलेच नव्हते.....अर्थात त्याने मला भेटवलच नव्हत...पण जेव्हा मी स्वतः ती गोष्ट वाचली.....तेव्हा माझं रोहित सरांवारच प्रेम ....त्यांच्या बद्दलचा माझा आदर आजून वाढला....आणि आजून एक.....त्यावेळेचे रोहित सर आणि आत्ताचे रोहित सर ह्यात फक्त एकच फरक आहे कि तेव्हा तो फक्त रोहित होता पण आता तो सौनिकपण आहे......"
सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या....मग निमगावकर सर स्वतःच उठले आणि म्हणाले...
" पुढचा प्रश्न मी विचारणार आहे...रोहित आधार गोष्ट कशी सुचली तुला?
"सर , आधार हि एक फार सुंदर गोष्ट आहे...मला माझ्या लिखाणातली सर्वात आवडलेली गोष्ट....पण ती मला सुचली एका बागेमध्ये...त्या बागेमध्ये एक फार रहीस कुटुंब आपली २-३ कुत्री, त्यांना सांभाळण्यासाठी असलेले २ माणस आणि एक व्हील चेयर वर बसलेली मुलगी आणि तिला घेऊन जाणारी बाई असे सगळे घेऊन फिरायला येत असत...." रोज ते तिथे येयचे...रोज ती व्हील चेयर वरची मुलगी त्या बागेतल्या फुलांकडे...फुलपाखरांकडे बघून मनसोक्त हसायची...तिथे खेळणाऱ्या मुलांकडे पाहून स्वतःला आनंदित करून घेयची....पण ती कधीच त्या चेयर मधून उठत नसे....एकदा मी त्या बाईला विचारल....म्हणल.....
"कहो बाई....हि मुलगी रोज इथे येते....हसते ....मुलांकडे पाहून आनंदित होते...पण कधीच स्वतः त्यांच्यात जात नाही....तेव्हा ती बाई म्हणाली...."सर , तिचा एक पाय नाहीये....ती उभी राहू शकत नाही.....आधी ती खूप खेळत असे.....बागडत असे...पण आता नाही..."
ते ऐकून क्षणभर डोळे पाणावले.....आधारच महत्व मला तेव्हा कळल...आणि त्यातूनच आधार गोष्टीचा जन्म झाला...."
Sunday, December 23, 2012
पुन्हा गोष्ट लोकलमधली - ९
" " आई" ....माझी सगळ्यात लाडकी कविता.....आणि तीच मी त्या स्नेहसंमेलनात वाचणार होतो...असो....आज मी तुम्हा सगळ्यांना त्या कवितेचा शेवट ऐकवतो....
" हे देवा!! ज्यांना नाही ही आई
त्यांना कोण बरे तारी
माझा धन्यवाद तुला
तू दिलीस मला आई "
पुन्हा टाळ्या कडाडल्या...." मुलांनो , आई ह्या शब्दाशी माझ्यामते प्रत्येकाच एक अलौकिक नातं असतं....तसं माझंपण आहे.....आज जे काय ....जसा काय मी तुमच्यासमोर उभा आहे तो केवळ आणि केवळ माझ्या आई आणि बाबांमुळे आहे.....हे लिखाणाच बाळकडू तिने मला खूप लहानपणापासून दिल.....ते म्हणजे निबंध लेखनातून....खरच तिने निबंध ला "नि" + "बंध" का म्हणतात हे मला पटवून दिलं आणि मला लिखाणच जमायला लागल...तेव्हा मुलांनो, तुम्ही आत्ता ज्या वयात आहात त्या वयात.....खरच खूप खेळा, मज्जा करा....आनंद लुटा....पण त्या बरोबरच आईचं म्हणन नेहमी ऐका....ती व्यक्ती कधीच तुम्हाला काहीही चूक सांगूच शकत नाही....ह्यापुढच जीवन अधिक अधिक वेगवान होत जाणारे....तुम्हाला तुमचा तोल सांभाळायचा आहे...तोल संभाळण तुमच्या आईकडून शिकून घ्या.....प्रेम कारण आणि प्रेम देण तुमच्या आईकडून शिकून घ्या....
मित्रांनो, तुमच्यापैकी काही मुलांनी माझ्या ब्लोगवरची आधार गोष्ट वाचली असेल....मला तुम्हाला एवढच सांगायचं आहे की.....जो गरजू आहे त्याला नक्की मदत करा....त्याला नक्की आधार द्या....पण कोणालाही कधी आधाराची सवय लावू नका.....कारण त्याची एकदा सवय लागली कि माणूस पाची इंद्रियांनी दणकट असूनही कुबडा होतो.....
मुलांनो , शेवटची पण अतिशय महत्वाची गोष्ट....तुम्ही ज्या कोणाबरोबर राहता....त्या प्रत्येक माणसाला ओळखायला शिका....तुम्ही एकदा ओळखायला शिकलात की तुम्हाला कोणी भुलवू शकत नाही....तुमचा कोणी फायदा करून घेवू शकत नाही.....बाकी तुम्ही सगळे खूप हुशार तर आहातच पण भरपूर अभ्यास करा....वाचा ....खेळा आणि सतत सुख शोधत बसण्यापेक्षा....आलं त्यला सुख मानत चला.....बघा सुख आपोआप तुमच्याकडे येयील आणि तुम्ही नेहमी आनंदी रहाल.....
मला इथ बोलावलत...एवढा मोठा मान दिला त्याबद्दल तुमचे मनापासून आभार....हि शाळा अशीच पुढे जाओ अश्या शुभेत्छां देतो...धन्यवाद"
परत टाळ्यांचा कडकडाट झाला .....मी माझ्या जागेवर परत येयून बसलो....नेहानी हळूच तिचा हात माझ्या हातावर ठेवला....माझ्या भाषणाला मिळालेली ह्यापेक्षा मोठी दाद असूच शकत नाही.....
Subscribe to:
Posts (Atom)