मी त्या अस्ताकडे जाणाऱ्या सूर्याकडे बघत उभा राहिलो..तेवढ्यात माझ्या पाठीवर कोणीतरी हात ठेवला....
" नेहा...किती उशीर ?? कुठे होतीस तू.??" असं म्हणत मी मागे वळलो...आणि पाहतो तर काय रोहीत्या..??
"काय रे तू आणि इथे??
का? मी येयू शकत नाही का इथे..?? तुझी नेहाच का फक्त?
नाही रे असं काही नाही....ते सोड..काय म्हणतोयस?
काही नाही रे..म्हणल बऱ्याच दिवसात आपण बोललो नाही म्हणून आलो...चल ना एक फेरी मारुयात..
अरे खर तर ना मी नेहाची वाट बघतोय....ती येण्यातच असेल आता...परत आमची चुकामुक होईल...
अरे एवढ काय... ती समजा आली तर फोन करेल ना....तुला भेटल्याशिवाय थोडी जाणारे...
बर चल " असं म्हणून आम्ही निघालो...बऱ्याच दिवसांच्या गप्पा राहिल्या होत्या...प्रॉफ लोकांबद्दल, स्वतःच्या guide बद्दल चर्चा सुरु झाल्या...वेळ कसा गेला कळलच नाही...शेवटी परत फेरी मारून आम्ही त्याच जागी परत आलो..अंधार झाला होता...गार्डन मधले दिवे आजून का लागले नव्हते कुणास ठाऊक...? तेवढ्यात रोहीत्यचा फोन वाजला.....तो बोलत बोलत जरा लांब गेला...आता मात्र फारच उशीर झाला होता...नेहाचा आजून पत्ता नव्हता...मला आता काळजी वाटायला लागली होती...मी तिला फोन लावला...तर switchoff येत होता....माझी काळजी आणखीच वाढली....तेवढ्यात गार्डन मधले दिवे लागायला सुरुवात झाली...मी जिथे उभा होतो त्याच्या समोरच एक वाट होती आणि त्याच्या दोन्ही बाजूला दिवे होते...ते दिवे हळू हळू लागू लागले.....त्या वाटेवरून कोणीतरी येतंय असं अंधुकसा भास मला होऊ लागला होता ..ती व्यक्ती जशी जशी पुढे येयू लागली...तसे तसे त्या वाटेवरले दिवे लागत जात होते...आणि जेव्हा सगळे दिवे लागले तेव्हा ती व्यक्ती माझ्या मिठीत होती...आर्थात ती नेहा होती...आज ती काय दिसत होती...तिने चक्क साडी नेसली होती...मरून रंगाची...केसाची एक बट हलकीशी चेहऱ्यावर येत होती...कानात छोटेच पण खड्यांचे झुमके घातले होते...हातात मी दिलेलं ब्रेसलेट होतच आणि सगळ्यात महत्वाच म्हणजे हातात खूप साऱ्या पिशव्या होत्या...मी तर ह्या सगळ्यात पार विरघळून गेलो होतो...मला फक्त नेहाच दिसत होती...नंतर टाळ्यांचा आवाज येयू लागल्यावर मला कळल की, एकटी नेहा आली नव्हती...माझे सगळे मित्र...तिच्या खास मैत्रिणी आणि माझे आणि तिचे दोघांचेही आई बाबा समोर उभे होते.....इतक romantic surprise आणि ते पण marine drive च्या साक्षीने ....खरच माझे डोळे नकळत पाणावले...मी नेहाला आजून घट्ट मिठीत आवळल आणि म्हणल "Thanx" !!!!!!!
No comments:
Post a Comment