अगदी कालचीच गोष्ट आहे...साधारण ४ वाजले होते.....दुपारी आंब्याचा रस खाल्ला आणि कधी डोळा लागला कळलच नाही......ते थेट ३:४५ लाच जाग आली...पटकन उठून तोंड धुतलं.....चहा केला.....बरोबर ४ ला बाहेर पडलो.....taxi पकडली.....दादर TT गाठलं.....पाहतो तर काय शिवनेरी साठी हे भली मोठी line....गुपचूप शेवटी जाऊन उभं राहिलो......एकही शिवनेरी फलाटावर उभी नव्हती....तिकीटाची रांग त्यामुळे पुढे सरकतच नव्हती...तेवढ्यात एक म्हाताऱ्या आजी आल्या आणि म्हणाल्या....
"कोथरूडमार्गे जाणाऱ्या गाडीच तिकीट इथेच मिळत का..?? "
मी काही बोलणार तोच....एक सुंदर आवाज ऐकू आला..
"हो आजी....."
त्यांच बोलणं तोडत मी पण म्हणल....
"नाही आजी.....त्याच तिकीट seperately मिळत...
हो का? नाही पण हि तर म्हणाली इथेच मिळत....
तिला काही माहित नाहीये.....तुम्ही असं करा....पुढे त्या चोकशी window ला जाऊन विचारा"
"इथे मिळत नाही का खरच चिंचवडच तिकीट?
नाही....तुला....i mean तुम्हाला कुठे जायचय?
पुणे....
हो ते झालं...पणकुठे उतरायचं आहे
शिवाजी नगर...
हो मग तुम्हाला तिकीट इथेच मिळेल....
आज बसेस फार लेट आहेत...
हो ना....
अस बोलता बोलता....५;१५ झाले तरी बसचा पत्ता नव्हता ...शेवटी एक बस आली...पुन्हा तिकीटाची रंग सुरु झाली....
मला खरच काही कल्पना नव्हती की एका अजब प्रवासाला सुरुवात करायचं तिकीट मी काढतोय....इतका फिल्मी प्रवास होईल अशी तर बिलकुल कल्पनाच नव्हती....पण तरीही.....पुणे-मुंबई-पुणे ह्या प्रवासानी मला नेहमीच काहीतरी दिलंय पण....ह्यावेळी जरा ते हटके होत इतकच........
No comments:
Post a Comment