तिच्या त्या msg ने एक वेगळाच रंग ह्या गोष्टीत भरला होता.....basically त्या msg नंतरच मला हे कळलं होता कि आमच्यात काहीतरी गोष्ट आहे or सुरु होतीये.....हरेक दिवस काहीतरी नवी रंगत आयुष्यात घेऊन येत होता.....त्यादिवशीपण नेहमीप्रमाणे सगळा आवरून घाईघाईने मी स्टेशनवर पोचलो..९:२५ झाले होते..मी ट्रेनच्या announcement ची वाट पाहत होतो...तेवढ्यात announcement झाली..."ठाणे जानेवाली १२ डीब्बोकी धीमी लोकल आज रद्द कर दि गायी है...यात्रियोको होनेवाली असुविधा के लिये खेद है...." माझ्यासाठी जणू ती आकाशवाणीच होती......आज ती भेटणार नाही हे जाणवल्यावर...आयुष्यात कधी नव्हत्या घातलेल्या त्या सगळ्या शिव्या "भारतीय रेल" ला घालून मी पुढच्या ट्रेन मध्ये चढलो....सगळा mood off झाला होता....विक्रोळी आलं...मी उतरलो..चहा टपरीवर गेलो..एक चहा सांगितला....समोरच एक ड्रेस चा सेल लागला होता..एक सुंदर maroon रंगाचा पंजाबी suit बाहेर लावला होता...मी सहज त्याला जाऊन हात लावला..तेव्हढ्यात...."भैयाजी....इस्की किमत क्या है"??? असा गोड पण परिचित आवाज माझ्या कानी आला...आयला नेहा???....आम्हाला दोघानाही एकच ड्रेस आवडला होता.....पण ती इथे कशी असेल..??? असा मीच मला विचारलं....तेवढ्यात पुन्हा आवाज आला..." कुछ तो काम करो.. " आता मात्र मी पुन्हा वळलो..थेट दुकानात गेलो...नेहा ड्रेस घेत होती...तिला पाहून सकाळी १२च्या उन्हात वाळा घातलेलं थंड पाणी पेयला सारखा वाटलं....तिनी पाहिलं....म्हणाली.."काय आलास??" मी तुझीच वाट बघत होते.. म्हणलं तू येयीपर्यंत timepass करावा....so आले इथे..hws this suit??"....हे सगळं मला स्वप्नच वाटत होतं...मी म्हणल हो....खूप..!!!! तुला खूपच छान दिसेल... सो काय राग नाही न आला माझा....no ची गम्मत केली म्हणून विचारते....."नाही ग its k".....keep it up..!!!..नंतर .ती चहाची ओर्डर घेतली...तिच्या त्या दिवशी माझ्याबरोबर अनपेक्षितपणे असण्याने त्या चहाची मजा सुद्धा फिकी पडली होती.....वाटलं त्यापेक्षा दिवस खूपच छान होता...तिचं माझ्यासाठी स्टेशनवर थांबणं खूपच धक्कादायक होतं...पण असो...हे सगळं मला आवडत होतं....
No comments:
Post a Comment