दुसर्या दिवशी रात्री १०:३० ची वेळ होती...नेहाचा msg आला...."आता marine drive ला ये...urgently ...."....मी लगेच तिला call लावला...पण ती सारखा फोन cut करत होती...मला अजूनच काळजी वाटायला लागली...एकतर एवढ्या रात्री marine drivela हि एकटी काय करतीये??? आणि...msg पण असा केलाय कि त्यातून काहीच कळत नाहीये...आणि फोन पण उचलत नाहीये....मी ताबडतोब आवरलं...स्टेशन गाठलं....आणि ट्रेन मध्ये बसलो...मी सारखा नेहाला फोन try करत होतो..ती काहीकेल्या उचलत नव्हती...मला प्रश्न पडला कि मी तिथे पोचल्यावर तरी तिला कसा शोधणारे...???...तेव्हा मी तिला msg केला..."r u ok ?.....atleast तू कुठे आहेस ते तरी सांग...??..आणि तू फोन का नाही उचलतेस..??" १० मिनिटांनी तिचा reply आला..."तू कुठे आहेस...पटकन ये...मी marine lines स्टेशनच्या बाहेर आहे.."तेव्हा grant road स्टेशन आलं होत...मी marine lines ला उतरलो...घाईघाईने बाहेर आलो....नेहा काही बाहेर दिसली नाही....मी आणखीनच घाबरलो...पुन्हा तिला call केला...तिने तो उचलला....
"अग कुठे आहेस तू..?? हे काय चाललाय तुझं?? नीट
सांग काय झालय ते..??....."....
" तू कुठे आलायेस ते सांग आधी...."...
"मी आता स्टेशनवर पोहोचलोय "
"अरे मग रस्ता क्रॉस करून ये...मी तुझी वाट पहातीये..???"
मी पटकन रस्ता क्रॉस केला...नेहा समुद्राकडे पाहत उभी होती....मी लगबगीने तिच्याकडे गेलो...क्षणभर मला काहीच कळेना....नेहा खूपच सुंदर दिसत होती....तिने लाल रंगाचा पंजाबी suit घातला होता..केस साजेश्या पण वेगळ्याच पद्धतीने बांधले होते...चार बटा...बरोबर डोळ्याच्या बाजूला येत होत्या...कानात झुमके घातले होते...हातात एक ब्रेसलेट घातलं होत.....मला वाटलं कुठेतरी जाऊन आली असेल ती...मी तसाच थांबलो दोन मिनिटं....तिच्याकडे मनसोक्त बघून घेतलं...मग तिच्याशी बोलायला पुढे गेलो तोच ती समोर आली...माझ्या ओठांवर...बोट ठेवलं....माझा हात हातात घेतला...आणि बोलायला सुरुवात केली...
" समीर, मला तुला काही सांगायचं, काही विचारायचं आणि काहीतरी मागायचय.....पण आधी मी सांगते...मला काही फार romantic वगरे होता येत नाही...आणि मला फारसं नटता पण येत नाही...असो..तुझा कालचा blog update वाचला...खूप सुंदर कविता लिह्लीयेस तू...त्यात तू एक stanza लिहलायेस....तिने डोळे मिटले आणि ते कडवं म्हणायला सुरवात केली...
"हुरहुरणाऱ्या क्षनान्मधली आस
नसता असता होणारा ग भास
तू.... असण्यात तू......तू.....नसण्यात तू......
तू.....श्वासात तू.... तू...सगळ्यात तू......"
नसता असता होणारा ग भास
तू.... असण्यात तू......तू.....नसण्यात तू......
तू.....श्वासात तू.... तू...सगळ्यात तू......"
खरच समीर....i love u .... !!!!!!!!!.".....मला क्षणभर सगळं स्वप्नासारखच वाटत होतं...
काही कळायच्या आत...मीपण तिला i love u too म्हणल....सगळं जग जिंकल्यासारख वाटत होतं...मनावरचं खूप मोठं दडपण गेल्यासारखं वाटत होतं...कारण....नेहा...मी...marin drive .......आणि ती कविता...सगळं तेच होतं...पण जणू...नवा रंग हरेक गोष्टीला आला होता....ज्या काही गोष्टी आजवर ...माझ्या होत्या त्या सगळ्या आता आपल्या झाल्या होत्या...एक आर्थी...मी world cup semifinal जिंकलो होतो...त्या दिवशी marine drive ने मला माझ्या आयुष्यातलं सगळ्यात beautiful आणि मोठं गिफ्ट दिलं होतं....त्यारात्री...सगळ्या आनंदात...आंम्ही naturalcha ....ice -cream खाल्लं....तिला घरी सोडून मी पण घरी परत आलो...मला कधी एकदा त्या लोकलला thnx म्हणतोय असं झाला होतं....
No comments:
Post a Comment