Friday, May 27, 2011

गोष्ट लोकलमधली-१४

 आईशी बोलणं झाल्यावर लगेचच मी नेहाला call केला...
" हेलो, नेहा आपण जिंकलो...माहितीये मला आई काय म्हणाली..आपण कोल्हापूरला जायचय..नुसत देवीच्या दर्शनाला नाही पण तुझं घर पाहिला सुद्धा....भारी ना...
  अरे काय सांगतोयेस काय....?? खरच...अरे पण एक लोचा आहे ना..मी कुठे सांगितलाय घरी आजून?? direct तुम्ही घरी येणार म्हणजे जरा odd वाटेल ना ते...त्याआधी निदान माझ्या आईला तरी कल्पना देयला लागेल...ना..
hmmmm ....मग आता काय करायच? 
आता तेच जे आपण तुझ्या आईबाबत केलं....second inning of the match ....माझ्या आईची भेट...
आग ते ठीक आहे पण ते कसं? काकू तर कोल्हापूरला आहेत..ना....मग त्यांना कसकाय भेटणार मी?
 त्याची काळजी तू करू नकोस .....तू कोल्हापूरला जायची तयारी कर...अरे पण आपण एक गोष्ट विसरलोच....तुझ्या आईला मी आवडले हे तर ठीक आहे पण तुझ्या बाबांचं..काय त्यांना तर मी भेटले पण नाहीये... 
आता त्याची काळजी तू करू नकोस....आता lets begin mission kolhapur ....
ठीक आहे मग तर done .....आता बाकी planning तुमची कोल्हापूरला येयची date fix झाल्यावर..."
असं म्हणून तिने फोन ठेवला..मनाला एक विचित्र पण हवहवस समाधान वाटत होत....
     मग मध्यंतरी माझ्या परीक्षा सुरु झाल्या....पेपर्स चांगले गेले...आणि मी ४ दिवसांच्या सुट्टीसाठी पुण्यात परत आलो....सगळ्यात महत्वाच्च काम म्हणजे बाबांना सांगायचं होतं...ते काम मी आईकडेच सोपवलं होतं...त्यादिवशी आईला मी फक्त त्याची आठवण करून दिली....ती म्हणाली....समीर...result लागला का रे तुझा? grades कळले का..??
मग कळले ना....मला ९.४५ मिळालेत...ते बाबांनी ऐकलं....
ते म्हणाले...छानच मिळालेत मार्क्स....नेहाला सांगितलेस?.......
हो मग....एक मिनिट कोणाला सांगितले? कोण??
नेहा.....तुला माहित नाही कोण नेहा ते??  
बाबा....नेहा आणि तुम्ही i mean तुम्ही ओळखता तिला? कसकाय?? त्या result पेक्षा मला ह्याचाच आनंद झाला होता...आई आणि मी दोघही काहीही कळत नसल्यासारखं, गांगरून गेल्यासारख एकमेकांकडे पाहत उभं होतो.. 
 "पकडलं कि नाही मी बरोबर ते सांग आधी....अरे राजा....त्यादिवशी एकट्या आईला भेटवलस....बाबांना विसरलास ना....पण गम्मत अशी झाली..कि तुझी नेहा इथे तीच office id विसरली...दुसर्या दिवशी सकाळी ती आली होती..पण तू आईला घेऊन मंदिरात गेला होतास....बेल वाजली...मी दार उघडलं....
" हेल्लो काका मी नेहा...समीर ची frnd ....
  ये ना...आग समीर मंदिरात गेलाय...काही काम होता का तुझ?
   काका actuly ना मी काल आलेले तुमच्याकडे....काकुना भेटायला...संध्याकाळी...तेव्हा ना मी माझं office id  विसरले इथेच...तेच घेयला आलीये आणि म्हणल... समीर असेल तर जाऊ त्यालापण घेऊन...
कुठे?? तो तर iit मध्ये जाईल ना...? आणि तू नौकरी करतेस?
हो काका....ते काय आहे ना मी माझं btech iit मद्रासहून पूर्ण केलय...and then i m doing a job in mumbai...माझी आणि समीरची लोकल मध्ये ओळख झाली....
बर बर....समीर मला काहीच बोलला नाही....कधी तुझ्याबद्दल....तुझ्या येण्याबद्दल तू  त्याचा आईला भेटली त्याबद्दल...असो...थांब मी बघतो....तुझं id ....हे घे इथेच आहे.......बर समीरला माहिती होतं का कि तू आता येणारेस इथे...आणि तूं तुझं id विसर्लीयेस वगरे 
नाही हो काका....माझा रात्री फोन  discharge झाला सो मी त्याला काही कळवलच नाहीये...
आणि आता सांगायचं पण नाही....एक लक्षात ठेव मी तुला भेटलोय हे समीरला कळता कामा नये....बच्चू माझ्यापासून लपवतो काय...लेकीन हम भी तुमारे बाप है.....इतने आसानीसे हारने वाले नही...पोरी....तू अगदी सुंदर आणि ह्या घराला साजेशी आहेस...आमच्या सम्र्यान हिरा निवडलाय हिरा....नेहानी बाबांना नमस्कार केला....ते म्हणाले...नेहमी यशस्वी हो....आणि वचन दे मी जे काय बोललो त्यापैकी काहीही समीरला सांगणार नाहीस....
काका मी वचन देते.....पण तुम्ही खरच खूप छान आहात...हे छान असणं समीर नक्कीच तुमच्याकडून शिकलाय..."
"बापरे..... बाबा एवढा सगळं झालं आणि मला तिळमात्रही तुमी कळू दिला नाही....हि तुमची मिलीभगत होती तर....नेहान तुमच्यावर impression पाडायच्या ऐवजी तुम्हीच तिच्यावर पाडलं कि......पण तुम्हाला ती चांगली वाटली हे ऐकून मनाला खूप समाधान वाटलं....पण बाबा मला असा gas वर ठेवून तुमाला मज्जा आली असेल ना..??.मी आणि आई काय काय प्लान्स करत होतो कि तुम्हाला कसं सांगायचं कसं पटवायचं... पण तुम्ही तर खरच बाबा u r g8888 ......"असं म्हणून मी त्यांना एक गच्च मिठी मारली...डोळ्यातन दोनच आनंदाश्रु आले त्यांच्याही आणि माझ्याही....ते म्हणाले...   
  अरे वेड्या.....रडतोस काये..आता फक्त हसायचे दिवस आलेत....चला तयारी करा...कोल्हापूरला जायचं ना....आई म्हणत होती मला....आणि नेहाला सांग....हिरवा झेंडा माझ्याकडून....पोरा नाव काढलस...आधी...iit मध्ये शिकून आणि नंतर iit मध्ये शिकलेली पोरगी पसंत करून...."
धन्यवाद बाबा....आई...कोल्हापूरला कधी जायचं ते लवकर सांग...सगळं व्यवस्थित झालं होतं तरी आजून एक गोष्ट मनात सलत होती...ती म्हणजे मी आजून नेहाच्या आई वडिलांना भेटलो नव्हतो.... 

      

No comments:

Post a Comment