Wednesday, May 4, 2011

गोष्ट लोकॅलमधली-१०

 "सावरे सावरे...सावरे...
तेरे बिन सुनी सुनी हैन अखिया 
तेरे बिन लम्हा लम्हा हैन सादिया 
सुना सुना जहान लागे रे........सावरे...."

हे गाणं मी मोठ्या आवाजात laptop वर लावलं होतं.....डोळे मिटून शांतपणे ऐकत होतो...तेवढ्यात नेहाचा फोन आला .....ती नेहमीप्रमाणे बोलत नव्हती.....काहीतरी वेगळं तिच्या डोक्यात चालू होतं...."मी म्हणल काय झालय नेहा...काही प्रोब्लेम..??" नाही रे...असच बोर होत होतं सो call केला..मला सांग ना mtech ला तुझ्याबरोबर कोण कोण आहे...तुझे best frnds कोण आहेत.."
"hmmm ......रोहित,राकेश are my best buddies...आम्ही एकूण २० लोक आहोत .....का ग एकदम असा विचार्तीयेस आज ?"
"काही नाही रे....सहज...कोणी मुली नाहीत तुमच्याबरोबर??...."
"heehehe ...आहेत ना.....चांगल्या दिसणाऱ्या मुली आहेत..."
"हो का..?? मग तुझी असेलच कोणीतरी best frnd ..."
"हो मग आहे ना....प्रिया.....माझी batchmate आहे....खूप हुशार आहे...आणि दिसायला पण छान आहे.."
"hey समीर उद्या मला IITB ला येयचाय..मला तुझ्या frndsla  भेटायचंय...परत एकदा IIT  atmosphere experiance करायचंय... नेशील ना मला..???"
"हो नक्की नेईन कि...उद्या भेटू...दादरला नेहमीप्रमाणे...मग तूला direct IITB लाच नेतो..."
आता झोप शांत...चल bye ...."
दुसर्यादिवशी नेहमीप्रमाणे...दादरला भेटलो....ट्रेन गाठली...जागा मिळाली...पण नेहा खूपच शांत होती...तेवढ्यात मला msg आला....mobile नेहाकडे होतं...ती काही गाणी transfer करून घेत होती..त्यात लिहिलं होतं ....
"यार तुमने वोह D&K का assignment किया क्या?" आज discuss करते हैन...." नेहाने ताबडतोब mobile मला दिला...म्हणाली private msg आलाय....मी म्हणलं कुणाचा आहे म्हणून पाहिलं तर प्रियाचा...तिला reply केला "आज नही कल करेंगे....."
IIT मध्ये पोचलो...मी कुणालाच सांगितलं नव्हतं नेहा येणारे...मी गुल्मोहरला गेलो..तिथून सगळ्यांना call केला...सगळे आले..मेहाला भेटले...नेहा  सगळ्यांशी हसून बोलली वगरे...जाताना म्हणाली...अरे प्रिया कोण आहे..ती आली नाही..?? मला भेटायचंय तिला...मी तिला बोलवल ....ती आली...त्या भेटल्या...बराचवेळ बोलत होत्या..नेहा half day सांगून आली होती...सो तिला म्हणलं चल आता उशीर होईल...आम्ही निघालो...
गोष्ट काहीतरी वेगळच वळण घेतीये असं वाटायला लागलं.....दोन अतिशय भिन्न स्वभावाच्या मुली..इतकावेळ...हसत खेळत गप्पा मारत होत्या...मला जरा गम्मतच वाटली..त्या दिवशी..रात्री मी नेहाला call केला..
" hi ...काय चाललाय?? 
   कसे वाटले आमचे मित्र मैत्रिणी..??"
छान मस्त...मज्जा आली खूप... 
प्रीयापण मस्त आहे रे....बोलकी आहे...आणि खरच तू म्हणाला तसं... हुशार आहे...पण दिसायला मात्र बरी आहे बरका.,.."
"बर बर ....तू म्हणशील तसं....पण प्रीयापण मला हेच म्हणली..कि नेहा खूप हुशार आहे....even राकेश तर म्हणला..कसली आहे रे ती पोरगी...smart beautiful आणि simple ....कुठे भेटली...etcetc " 
हे ऐकून नेहा खुश झाली..पण खरच मित्रांना नेहा खूप आवडली होती....एक परीक्षा ती १००% गुणांनी पास झाली होती.... 


No comments:

Post a Comment