ओली हि हवा....धुन्द ह्या दिशा....स्वत्व चिंब झाले असे
ओल्या ह्या क्षणी, माझ्या गं मनी , दिसे तुझे चित्र कसे ???
हिरव्या ह्या वाटेवरी शोधले तुला
विचारले वाऱ्यासही माझ्या फुला
आसुसल्या स्पर्शासावे ,बोलक्या गंधासवे, वाहिले मन खुळे
ओल्या....
धावली सर् एकटी हाक ऐकुनी
काढले मम प्रेम तिने शोधुनी
धावुन येताच तू , मिठीत अन् हसताच तू , जाहले पूर्ण बघ चित्र ते ....
ओल्या....
सौनिक
No comments:
Post a Comment