Friday, July 8, 2011

स्वप्न...

स्वप्न...

त्या क्षितिजावर एक गोजिरे स्वप्नं पाहिले होते..
नाजूक काया, ओठ लाजरे...नयन बोलके होते....

उजाडलेल्या मनावारले...थेंब मधाचे होते...
कुजबुजलेल्या गोष्टींमधले रंग उद्याचे होते...

कसे कळेना भाव मनीचे तिला उमगले होते..
शब्दांमधले अर्थ तिने तर कधीच जाणले होते...

डोक्यामधले प्रश्न सारखे उत्तर मागत होते...
तिच्यालेखी हे सत्य होते वा फक्त स्वप्नच होते...

त्या क्षितिजाला माझे मागणे जेव्हा मागितले होते...
माहित नव्हते तिनेही तेव्हाच हात जोडले होते.....

                                                                 -सौनिक

No comments:

Post a Comment