Saturday, January 7, 2012

सौनिक-१८

पूर्वार्ध 
"आई......नाशिकला आपण कसकाय जाऊ शकतो??
  म्हणजे?? न जायला काय झालंय....तुझी ही वार्षिक परीक्षा झाली की जायचं....नाशिकला...नववी  नवीन शाळेत....त्यात काय आवघड आहे?
आई पण ......छे बाबा मला नाही जायचं हे गाव सोडून....ह्या गावाशी माझी सगळी स्वप्न दडलीएत......
काय?? कोणती स्वप्न?? काय बोलतोयेस तू..??
जाऊ दे काही नाही.....आपण माझी परीक्षा होईस्तोर तरी आहोत न इथे??
हो....बर चल पटकन हात-पाय वगरे धुवून ये....आणि मी सगळ्यांना जेवायला वाढतीये..."
  अस म्हणून आई स्वयम्पाघरात निघून गेली....मला मात्र काही केल्या हे पटत नव्हत....मी आजीकडे गेलो....अश्यावेळेला आजी सारखी निवाऱ्याची दुसरी कोणतीच जागा असू शकत नाही....मी तिच्या मांडीवर डोक ठेवल....आणि म्हणालो...
" आजी....आपण नाशिकला का चाललोय..??....मला नाही जायचंय नाशिकला...असं का होतंय..??
  बाळा....हे  बघ शांत हो....आणि नीट ऐक .... प्रत्येक माणसाची न एक गोष्ट असते...ती प्रत्येकाच्या आयुष्यात वेगवेगळ्या वेळी सुरु होते....त्यात वाटेत अनेक वळण येतात ....ती नेहमी आपल्याला हवी असतील अशीच असतील असं नाही....पण तरी त्या वळणांवर आपल्याला पुढे जावच लागत...तुझ्या बाबतीत हि  गोष्ट इथे सुरु झाली....कदाचित ती संपेल नाशिकला...कदाचित ती संपेल आता इथे ...हे गाव सोडताना पण एक गोष्ट लक्षात ठेव....की फुलांचे गुच्छ जसे सगळीकडे मिळतात तसे ते देण्यालायक लोकपण सगळीकडेच असतात ...आणि हे आयुष्य खूप मोठ आहे आणि तुझी गोष्ट सुरु करण जरी देवाच्या हातात असल तरी ती संपवण मात्र तुझ्या हातात आहे....तेव्हा आता फार विचार करू नकोस...चल जेवायला..."
आजीच्या ह्या शब्दांनी खरच मला विचारांच्या गुंत्यातून बाहेर काढल....मला आजून हे सगळ निधीला सांगायचं होत....
जेवण झाल....मी माझ्या खोलीत आलो...परत त्या unknown नंबर वरून message आला होता....
whats this yaar?? ....i dont know why are u angry on me??....but lets forget the past and start a new strory in present..?? what say??
मला काहीच काळत नव्हत.....past??...आणि तो पण विसर्ण्यासारखा?? काय असेल??? कोण असेल ??? हा ढोल्या पण ना .....आधीच उल्हास अन् त्यात फाल्गुन मास सारखी गत झालीये....??....सौनिक.....निधी...नाशिक....आणि भरीत भर तो unknown नंबर .....ह्या सगळ्यांनी माझ जीवन रहस्यमय बनवल होत....हे खरं.....

No comments:

Post a Comment