पूर्वार्ध
मी डोळे चोळत जागा झालो....बरोबर नको त्या गोष्टी नको त्यावेळी आठवतात आणि झोपमोड करतात हे मला जाणवल...मी हॉल मध्ये गेलो....आई पेपर वाचत होती...आईला म्हणलं
" आई चहा कर न थोडा....डोक जरा जड झालंय...
तेव्हड्यात बेल वाजली...मी दार उघडलं.....निधी आली होती....
" hi
निधी, ये न आत.....
हेलो काकू...
ये निधी...बरेच दिवसांनी आलीयेस..??
हो ना काकू...सध्या वेळच होत नाही.....आज खरंतर मी गणित समजावून घेयला आली आहे रोहीतकडून
बर बर....तू बस ....चहा घेणारेस....रोहीतसाठी बनव्तीये मी ...
हो घेईन ना ....
थांब आधी तुला पेढा देते ...
पेढा?? वां!!!! कशाबद्दल??
आग ते रोहितच्या बाबांचं प्रमोशन....SSSSSS
आई ....आम्हाला आभ्यास करायचाय....तू चहा झाला की हाक मार ...मी येतो घेयला....असं म्हणून मी त्याचं संभाषण तोडलं...माल काही केल्या निधीला बदली झाल्याच कळू देयच नव्हत...
बर मी देते आवाज...असं म्हणून आई चहा करायला गेली....मी आणि निधी माझ्या खोलीत गेलो...तिने गणिताची पुस्तकं आणि नवनीतच गाईड बाहेर काढलं....
सो निधी सांग काय येत नाहीये तुला..??
मला आधी सांग ...कसला पेढा देत होत्या काकू..??
आरे तुला पेढा महत्वाचा आहे की अभ्यास ..??
of course पेढा ....!!!!...hahahaha!!!!
निधी .....गणित सुरु कर ...पेढा आला की सांगेन...
बर बाबा ....हे उदाहरणसंग्रह १२ मधल १९ व गणित मला सुटत नाहीये ...
थांब बघू दे मला ...अरे हे तर सोपं आहे गणित....त्यांनी जे उद्यान म्हणलंय न गणितामध्ये ते काटकोन त्रिकोणी आकारात आहे तेव्हा तुला गणितात दिल्याप्रमाणे त्याची आकृती काढावी लागेल ...मग लगेच सुटेल...बघ सोडवून....
रोहित ....चहा झालाय रे....ये लवकर !!!!....आईने हाक मारली
बर आलो ....निधी तू सोडव मी आलो ...
दे ग आई...
हा ...हे घे चहा ....आणि हे दोन पेढे...
बर ..म्हणून मी ते सगळ घेऊन माझ्या खोलीत आलो....
मला सुटल रे ते गणित.....माझ्या लक्षात नाही आल ते की काटकोन त्रिकोणात आहे.....
ह्म्म्म.....बर चहा घे....आणि हा पेढापण...
हो.....आणि आता सांग...हा पेढा कशासाठी आहे ते...
आग....बाबांचं प्रमोशन झालंय.....त्याबद्दलचा आहे....
वॉव!!!!.....एकदम झकास....काकांना माझ्याकडून congrats सांग ....
ह्म्म्म सांगेन...."
मी निधीला आजून २-३ गणित समजावून दिली..... मी कटाक्षाने बदलीचा विषय टाळला होता...पण मला हे माहित होत की ....काही गोष्टी टाळतापण येत नाहीत आणि सांगतापण येत नाहीत.... !!!!!!!!
No comments:
Post a Comment