नुकतीच झोप लागली होती.....त्या समोरच्या माणसाच घोरणं पण थांबलं होत....शेजारचा फोन पण बंद पडला होता......मोबाईल वर माझ आवडत गाण पण लागलं होत. तेवढ्यात ती शेजारची मुलगी म्हणाली.....
" excuse me, पाणी आहे?? माझ्याकडच पाणी संपलय.....मी जड झालेले डोळे उघडत तिला बाटली काढून दिली....परत ती म्हणाली....
" तू काय करतोस?
मी अगदी बोलू कि नको अश्या स्वरात म्हणालो
"मी सध्या PG करतोय....."
"PG , बापरे इतका कस शिकवत रे तुम्हा लोकांना ?"
excuse me?? म्हणजे?....आपण किती वेळापासून ओळखतो एकमेकांना?
i guess from last 1:48 minutes....का रे??
बर काही नाही..तू काय करतेस....??
मी singer आहे....professional मराठी सिंगर....
ते हि म्हणाली आणि माझ्या डोळ्यावरची झोप गायब झाली
काय??
नाव काय तुझ??
कां आता का?? आपण किती वेळापासून ओळखतो एकमेकांना अस विचारू का मी?
बर नको सांगूस....
गार्गी कुलकर्णी...माझे stage shows असतात....उद्याच चाललीये मी.....दुबईला....म्हणून सिद्धीविनायकाच्या दर्शनाला आले होते.......
हो का....मी पण ब्लोग लिहितो.....कविता लिहितो.....
अरे वां .....
मी लिंक देईन नक्की वाच......
हो वाचेन न नक्की......
अरे ....मी विसरलोच.......एक एवढी मोठी सिंगर असताना .....मी मोबाईल मधली गाणी का ऐकतोय......एक गाण होऊन जाऊ दे....
अरे छे ...बस मध्ये कुठे....सगळे लोकं आपल्याकडे पाहतील....
त्यांना पाहू देत न...अस समज हे सीट म्हणजे तुझ स्टेज आहे....आणि बाकीचे सगळे सीट म्हणजे प्रेक्षक आहेत....आणि होऊन जाऊ दे गाण .....
एका अटीवर
तू पण माझ्या बरोबर म्हणायचस....
मी कुठे ?? आम्ही बाथरूम मध्ये गाणारी माणस
मग तू पण समज न तुझ्या सीटला बाथरूम ...आणि म्हण....
बर चल म्हणेन.....कुठला म्हणतीयेस गाण ??
थांब जरा विचार करू दे...."
अचानक.....प्रवासामध्ये वेगळीच energy आली होती....कोणीतरी आस्था चानेल लावलेल असताना त्यावर अचानक Tom and Jerry लागल्यासारखं झाल होत.....
No comments:
Post a Comment