हि गोष्ट आहे एका अफलातून व्यक्तीची.....एका अश्या माणसाची...ज्याने आपलं जीवन खूप आनंदात घालवल....कारण त्यांच नेहमी असं म्हणण होत कि..." दुसर्याला आनंद देण्यात जो काही आनंद मिळतो तो माझ्यासाठी पुरेसा आहे...कारण आनंद शेवटी पैश्यासार्खाच आहे....कितीही मिळाला तरी कमीच असतो...." नकळत केवढ मोठ सत्य एखाद वाक्य कधी सांगून जात....अंधारातून चटकन उजेडात घेऊन जात....रडण्यातून एकदम हासण्यात घेऊन जात....खरच...असो...पण त्या व्यक्तीच व्यक्तिमत्वच तसं होत....त्यांत.....मिश्कीलतेची झाल होती....विनोदाचा स्पर्श होता...पण मनाच मात्र वेगळंच होत....ते अतिशय सरळ आणि साध होत....अतिशय हळवं होत.....शरीर यष्टीने मात्र धिप्पाड.....आणि एक सवय...सारख पान खायचं....आणि "च्या मायला त्याच्या" म्हणून ते थुंकायचं....मग समोर कोण असो....ते कुठेही असोत....त्यांना काही फरक पडत नव्हता.....त्यांना पाहिलं कि मला पुलंच्या व्यक्ती आणि वल्लीतले कधी रावसाहेब आठवायचे....तर कधी नारायण आठवायचा....पण एकंदरीत...हि गोष्ट त्यांच्या भोवती घुमणारी असली तरी ती त्यांच्या विचारांभोवती जास्त घुमणारी आहे.......तर मग तयार व्हा अनुभवायला हा....लगोरीचा खेळ......
No comments:
Post a Comment