Tuesday, May 29, 2012

मुंबई-पुणे-मुंबई


"  मुख्तसर...... मुलाकात है .......अनकही....... कोई बात है.......
रातकी.......शैतानिया.......या अलग..... ये जजबात है....."" 

हे नवीन गाण मी लावल होत......आवाज फुल केला होता.....मला बाहेरच काही ऐकू येणार नाही ह्याची पूर्ण खबरदारी मी घेतली होती....मस्त पाय लांब केले....आणि डोळे मिटून शांतपणे गाणं ऐकणार तोच....गाण्याच्या volume पेक्षा मोठ्या आवाजात कोणीतरी म्हणाल...
"वैतागले यार मी ह्या शिवनेरीत.....पाई निघाले न तर ह्या पेक्षा लवकर पोचीन....."
मी हेडसेट कानातून काढले...तर माझ्या शेजारच्या सीट वरचीच ती मुलगी जोरजोरात बोलत होती....मी दोन मिनिट तिच्याकडे पाहिलं आणि स्वतःशीच हसलो...पुन्हा कानात हेडसेट घालणार तोच....
"तुमच्याकडे आमटीमध्ये खूप मसाला घालत असतील ना ??....आमच्याकडे तर मसाला कमी आणि most of the times...चिंच गुळच असतो........मला न आता खूप भूक लागलीये......आताच गाडी चेंबुरला थांब्लीये....तुमचं चेम्बुर....शेंगावाला आलाय....शेंगा घेऊ का मी....." असं म्हणून तिने शेंगा घेतल्या....परत फोन वर बोलायला सुरवात केली....
"शेंगा घेत होते....बोल.....हा आपण काय बोलत होतो....हान आमटी......अरे पण ते सोड....तुमच्या चेम्बुरचा वडापाव खूप छान असतो म्हणे....हो न....?? थांब गाडी थांब्लीये....पटकन उतरून घेऊन येते....असं म्हणून तिच्या हातातलं जे काय सामान होत तिने माझ्या मांडीवर अक्षरशः फेकलं ....आणि ती खाली गेली....वडापाव घेऊन आली....परत फोनवर बोलण सुरु झालं.....तिच्या आजिबात लक्षात नव्हत की तिने तिची पर्स माझ्या मांडीवर ठेवलीये म्हणून......मी निमुटपणे हा सगळा तमाशा बघत होतो.....प्रवासाला सुरुवात होऊन अवघे ३० मिनिटं झाले होते....ज्या गतीने ती मुलगी फोन वर बोलत होती....ते पण वडापाव खाता खाता....आणि आमटी सारख्या फालतू विषयावर ते पण तीच सगळ सामान माझ्या आन्गावार टाकून की ज्याच्याशी तिचा काही एक संबंध नाही.....मला दोन मिनिटं काहीच कळत नव्हत....मी ती कोणाशी बोलतीये ह्याचा अंदाज लावायचा प्रयत्न सुरु केला.....आणि शेवटी तिला मी पकडल....ती बोलत होती...
"हो अजिंठा पहा रे.....मस्त सिनेमा आहे....
बरोबर आहे मी सांगितल्यावर तर तू नक्की जाणार नाहीस....
माझ्यासाठी तरी जा....गाणी चांगली आहेत...."
ती नक्की तिच्या त्याच्याशी बोलत होती....मी जोरात खोकायचा प्रयत्न केला पण तो विफल झाला.....तिला धक्का लावायचा प्रयत्नही....फोल ठरला....शेवटी मी उठून तिला चांगलं ऐकवणार तोच तिने माझ्याकडे पाहिलं....तिने कानात तीन ठिकाणी कानातले symetrically घातले होते.....डोळ्यामध्ये खुपसार काजळ आणि पापण्यांभोवती खुपसारा  make-up केला होता....ती म्हणाली...
अरे दोन मिनिट होल्ड कर....
sorry बरका....माझ्या लक्षातच नाही आल....असं म्हणून तिने माझ्या हातातली पर्स घेतली आणि परत फोनवर बोलायला सुरवात केली...फोन वर नक्की तिचा तो होता की नाही मला माहीत नाही पण मुंबई-पुणे प्रवासातली माझ्या झोपेची  पहिली तब्बल  ४५ मिनिट त्या मुलीने घालवली होती हे खरे..... 
  

No comments:

Post a Comment