Tuesday, April 26, 2011

गोष्ट लोकलमधली-८

आणि finally भारत विश्वविजेता झाला.....सगळीकडे फटाक्यांची आतिषबाजी सुरु झाली...त्या रात्रीला दिवाळीच जणू रूप आलं होतं....आता मात्र खूप उशीर झाला होता...नेहाला घरी सोडायला जाण भागच होतं...आम्ही निघालो...रात्र झाली होती so आम्ही ट्रेननीच जायच ठरवलं.....दादरला पोचलो....कुपन पंच केले...आणि ट्रेनची वाट पहायला लागलो.....अचानक मला खूप मोठं झाल्यासारखं वाटत होतं...तेवढ्यात नेहा म्हणाली....सो Mr.Samir...एका मुलीबरोबर रात्री बारा वाजता दादर स्टेशनवर तुम्ही ट्रेनची वाट बघत होता हे तुमच्या आईला कळलं तर...???   मी तिच्याकडे खुन्नस देऊन पाहिलं....हे सगळे क्षण romantic आहेत हे कळण्याआधीच ते निसटत चालले होते...ट्रेन आली...आम्ही चढलो...तेवढ्यात माझा एक मित्र मला दिसला...खूप वर्षांनी तो भेटला होतां..आम्ही ९वी ला एकत्र होतो शाळेत...त्याच नाव..राहुल....थोडं बोललो वगरे...मी नेहाची ओळख करून दिली...मला हळूच बाजूला नेऊन राहुल म्हणाला...मस्त जोडी आहे...तीच का हि 'तूझ्या कवितांमधली .'..???तुझ्या ब्लोग्वरची...??? मी म्हणलं."हेहेहे....तू पण ना राहुल्या..अरे ती कविता आहे...तिला वास्तवापासून जितकं दूर ठेवशील तितकी ती खरी वाटेल मित्रा....आणि तू माझा ब्लोग वाच्तोयेस म्हणजे...thts gud.. तो म्हणाला अरे बरेच वाचतायेत....छान लिहतोयेस...चल माझं स्टेशन आलं...no दे तुझा पटकन...मी msd call देतो....
इकडे काय माहित ते कवितेच नेहानी कसकाय ऐकलं होतं...ती एकदम सुरु झाली...काय कविता??? सो Mr Sameer तर तुम्ही कवी आहात...ब्लोग लिहिता....आता कविता ऐकवा त्याशिवाय मी उतरणारच नाही....मी म्हणलं काय हे नेहा...आत्ता नाही...उद्या ट्रेन मध्ये....मी वहीच आणतो...तू वाच....no way आत्ता म्हणजे आत्ताच....ठीके...मी आठवू लागलो...

"मनातल्या मनात मी..काही बोलतो आहे..
स्वप्नातल्या त्या कळीचे नाव शोधतो आहे..

नाजूक त्या पाकळ्याशी खेळतो आहे...
उनाड त्या हासण्याशी भांडतो आहे...

गोंजारून त्या बटांना छेडतो आहे
ओठांवरील अबोल शब्द ऐकतो आहे

वार्यातल्या गंधासवे मी हिंडतो आहे
अवचित येयून गालांवरी मी तुझ स्पर्शतो आहे

तू इथे नाहीतरी, तुझ पाहतो आहे....
तव डोळ्यांमधील प्रेम सखे हे मांडतो आहे...."

तिने एव्हाना डोळे मिटले होते...त्या पापण्या जणू लाजून मला दाद देत होत्या...कविता संपली खरी...पण...माझ्या ब्लोगचा एक follower नक्की वाढला....एका अर्थाने...कवितेला खरी दाद मिळाली...होती...तिला घरी सोडलं....मी प्रथमच अशी कविता कुणासाठीतरी सादर केली होती...

1 comment:

  1. मस्त चाललंय हे... यात तू, तुझा blog , तुझा मित्र अशा real time गोष्टी आल्यामुळे थोडी चेतन भगत ची आठवण आली.. प्रथम पुरुषात लिहितोयस ना ..

    तिचं पात्र अजून ठळक झालं तर ? ती खूप नमुनेदार वाटतीये..

    ReplyDelete