हि गोष्ट आहे एका अफलातून व्यक्तीची.....एका अश्या माणसाची...ज्याने आपलं जीवन खूप आनंदात घालवल....कारण त्यांच नेहमी असं म्हणण होत कि..." दुसर्याला आनंद देण्यात जो काही आनंद मिळतो तो माझ्यासाठी पुरेसा आहे...कारण आनंद शेवटी पैश्यासार्खाच आहे....कितीही मिळाला तरी कमीच असतो...." नकळत केवढ मोठ सत्य एखाद वाक्य कधी सांगून जात....अंधारातून चटकन उजेडात घेऊन जात....रडण्यातून एकदम हासण्यात घेऊन जात....खरच...असो...पण त्या व्यक्तीच व्यक्तिमत्वच तसं होत....त्यांत.....मिश्कीलतेची झाल होती....विनोदाचा स्पर्श होता...पण मनाच मात्र वेगळंच होत....ते अतिशय सरळ आणि साध होत....अतिशय हळवं होत.....शरीर यष्टीने मात्र धिप्पाड.....आणि एक सवय...सारख पान खायचं....आणि "च्या मायला त्याच्या" म्हणून ते थुंकायचं....मग समोर कोण असो....ते कुठेही असोत....त्यांना काही फरक पडत नव्हता.....त्यांना पाहिलं कि मला पुलंच्या व्यक्ती आणि वल्लीतले कधी रावसाहेब आठवायचे....तर कधी नारायण आठवायचा....पण एकंदरीत...हि गोष्ट त्यांच्या भोवती घुमणारी असली तरी ती त्यांच्या विचारांभोवती जास्त घुमणारी आहे.......तर मग तयार व्हा अनुभवायला हा....लगोरीचा खेळ......
Wednesday, June 29, 2011
Tuesday, June 28, 2011
प्रिय वाचकांनो..........
प्रिय वाचकांनो,
आधार तुम्हाला कशी वाटली ते please मला सांगा...मला तुमच्या प्रतिक्रियांची आवश्यकता आहे...त्यामुळे मी आजून चांगल लिहण्याचा प्रयत्न करेन....तेव्हा जे कोणी माझा ब्लोग नियमितपणे वाचतात त्यांनी आपल्या प्रतिक्रिया जरूर मला कळवाव्यात हि विनंती...
एक नवीन गोष्ट चालू करतोय....आशा आहे ती पण तुम्हाला तितकीच आवडेल....लवकरच post करेन....तेव्हा असच वाचत रहा....नेहमी खुश रहा....धन्यवाद...
तुमचा ,
सौनिक
Monday, June 27, 2011
आधार....५
लग्नाचा आदला दिवस आला....सगळीकडे पाहुण्यांची नुसती धूम होती....सुनीलतर खूपच कामांमध्ये अडकून गेला होता.....त्याची आईपण दिवसभर पाहुण्याच पाहण्यात गुंतून गेली होती...सई मात्र तशीच एकटी तिच्या खोलीत बसली होती...तिच्यासाठी काहीच नवीन नव्हत...मी आसच बोलता बोलता...सईच्या बाबांना विचारल...
"काका सईला सुधा बाहेर आणायला पाहिजे ना....तिला पण वाटतच असेल ना कि आपण पण नटाव....छान नवीन कपडे घालावेत...सगळ्यामध्ये मिसळून रहाव...
असं काही नाही वाटत तिला....तिला एवढा विचार करायला सुचलं पाहिजे.....आणि ती तर अपंग आहे...जगायचा विचार करते एवढ पुरे आहे...."
स्वताच्या मुलीबद्दल एवढ वाईट कदाचितच कोणी बाप बोलला असेल.....मला त्यावेळी काकांचा खूप राग आला...मी काहीच बोललो नाही....मी फक्त काकांना त्यांच्या विचारानंमधलं अपंगत्व त्यांच्या निदर्शनास आणून देयच ठरवल...
शेवटी लग्नाचा दिवस उजाडला...सगळ्या मंडळीनी रुखवत मांडला....त्या रुखवतात एक सुंदर गणपतीच चित्र सगळे अगदी आवर्जून पाहत होते...सगळे म्हणत होते....
" काय सुंदर काढलाय हो हे चित्र...इतका रेखीव गणपती..ते पण हातानी काढलाय....कौतुक आहे.....नंतर नवरी मुलगी म्हणजे...सुनीलची बहिण रुखवत पहिला आली...तिने तो गणपती पहिला...तिच्या डोळ्यात चटकन दोन थेंब आले.....ती धावत आपल्या वडिलांकडे गेली...त्यांचा हात धरून त्यांना घेऊन आली...त्यांना म्हणाली...
" बाबा....हे बघा...हे गणपतीच चित्र...आपल्या सयुनी काढलय.....ते पण माझ्यासाठी....
काकांचे डोळे चमकले....त्यांनी चित्र पाहिलं...त्यांना काहीच सुचेना...इतक सुंदर चित्र सई काढू शकते किंबहुना सई काही करू शकते ह्यावर त्यांचा विश्वासच नव्हता...त्यांचा चेहऱ्यावर आनंद मावत नव्हता....त्यांनी जोरात सईला हाक मारली...सई दचकली.....तिला वाटल आपल्या हातून काहीतरी चुकलय...म्हणून ती तशीच खोलीत आजून लपून बसली...तीच काही उत्तर येयीना हे पाहून काका, तिची ताई....तिच्या खोलीत आले...सई अक्षरशः थरथर कापत होती...काका तिच्याजवळ गेले...ती उभी राहिली...काकांनी तिच्या समोर हात जोडले...आणि म्हणाले
" पोरी, मला माफ कर...तुला अपंग.....निराधार म्हणून मीच अपंग झालोय...माझ्या विचारांमधल अपंगत्व मीच जगाला दाखवून दिलाय.....नाजूक फुलाप्रमाणे असणार्या तुला मी काटा समजत राहिलो.....पण तसं समजत असताना माझ फुल मात्र कोमेजत चालल होत...हे माझ्या आत्ता लक्षात आल.....
सईचे डोळे पाण्यानी चिंब भरले होते...कधीनव्हे तिने पण आनंदाश्रू अनुभवले होते.....तेवढ्यात काकू धावत तिथे आल्या.....हे सगळ पाहून आम्हाला कोणालाच आश्रू आवरण शक्यच नव्हत...पण काकू माझ्याकडे आल्या..माझ्यासमोर हात जोडले आणि म्हणाल्या...
"आज तुम्ही माझ्यावर खूप मोठे उपकार केले आहेत...माझ्या सईला आज नवीन जन्म, जगण्याची नवी उमेद तुम्ही दिली....तिला खरा आधार तुम्ही दिला....तुमचे उपकार आम्ही कोणीच कधी विसरणार नाही..
आहो काकू, हे काय....ह्यात उपकार काय...मी फक्त सईला बोलत केल..तिच्या चित्रामधून...तिने सगळ्यांच्या बोलण्याला खोडून काढलं...तिच्या चित्रातून...तिने सिद्ध केल कि अपंग ती नाही आपण आहोत...आपण निराधार आहोत....कारण तिच्यासारख्या लोकांमागे तर देव हाक न मारताच उभा असतो...आधार देयला....
Saturday, June 25, 2011
गोष्ट लोकलमधली-१९
एकदा जाहले...मन हे बावरे.....तू पाहिले .....मन हे भुलले
ते ही म्हणले मला, प्रेम कर तू जरा
आली ही वेळ अशी सावळी, जायचे सोडून...
मनात आहे जे सारे काही, टाकावे सांगून...
तूच श्वास आणि माझी हर प्रार्थना....
ते ही...
मनात चाललेलं सगळ काही ह्या कवितेन इतक्या सहजपणे सांगून टाकल होत....मी ताबडतोब ती कविता fair केली.....मनातली चलबिचल मात्र कायम होती...पण तरी मी डोळे मिटून झोपायचा प्रयत्न करू लागलो....सकाळी लवकर उठलो....पटकन आवरलं....दादरला पोचलो...९:२५ झाले होते...मी घाईघाईने platform गाठला.....नजर आणि मन एकाच गोष्टीचा विचार करत होते...९:३५ झाले..ट्रेन आली...मी लगबगीने डब्ब्यात चढलो....ट्रेन त्यादिवशी गच्च भरली होती...मी तसाच रेटत रेटत आत जायचा प्रयत्न करू लागलो...मी आत आलो...नेहा आत बसली होती...तिला कधी एकदा ती कविता दाखवतोय अस झाल होत..पण गर्दीच इतकी होती की आम्ही एकमेकांकडे फक्त पाहू शकत होतो...शेवटी विक्रोळी आल...आम्ही उतरलो....नेहा कुठल्यातरी कामात गुंतली होती...तिचा हात धरला आणि तिला कविता वाचून दाखवायला सुरुवात केली....पण तीच काही लक्षच नव्हत.....ती कुणाला तरी message करण्यात गुंतली होती....मला जरा वेगळ वाटत होत...नेहमी डोळे मिटून माझी कविता ऐकणारी नेहा आज लक्ष पण देत नव्हती...एवढ काय काम होत तिला....म्हणून मी तिला विचारल...
" सोना, काही problem आहे का?...कुठल्या कामात एवढी गुंतालीयेस की तुझ कवितेकादेपण लक्ष नाहीये.....
अरे कुठे काय...??....मस्त आहे रे कविता...एकदम आपल्या present situation ला अनुसरून आहे...
हो का??? तुला आवडली....??? चला म्हणजे तू ऐकलीस तर...
चल आता मला गेल पाहिजे....शेवटी शेवटी बॉस बोलेल नाहीतर मला....अस म्हणून ती निघून गेली....मला सारख काहीतरी वेगळ वाटत होत...मी पण IIT मध्ये गेलो...तिथे मित्रपण कशात तरी busy होते .....आज दिवसच बेकार आहे अस म्हणून मी माझ काम करू लागलो.....तेवढ्यात मला msg आला...नेहाचा होता...
"आज संध्याकाळी...urgently hanging garden च्या resort मध्ये मला भेट"....सोना....
"आज संध्याकाळी...urgently hanging garden च्या resort मध्ये मला भेट"....सोना....
मला काही कळेना....काय झाल होत...आणि एकदम hanging garden ......????
Sunday, June 19, 2011
गोष्ट लोकलमधली-१८
त्यादिवशी रविवार होता...मी आणि नेहा दोघही मुंबईतच होतो....सो मी तिला marine drive वर संध्याकाळी बोलवल...ठरल्याप्रमाणे...ती ६:३० ला marine lines ला उतरली...माझा फोने वाजला....
" कुठे आहेस तू..??
आपल्या नेहमीच्या जागेवर....
बर मी आलेच...
नेहा आली...मी गाणी ऐकत होतो...एकदम तिने एक letter mazya हातात दिल...तिच्या companycha लोगो त्या पाकिटावर होता....मला वाटला काय pramotionchach letter आहे...म्हणून मी आनंदात ते उघडल.....आणि वाचू लागलो....हातात माझा आवडता mobile ......कानात माझ आवडत गाण....माझ्या जवळ माझी सर्वात प्रिया आणि नाजूक गोष्ट बसलेली असतानाही एक अतिशय नावडती गोष्ट घडली होती....नेहाची मुंबईहून बँगलोरला बदली झाली होती.....
"wats this nonscence sona??? r u kidding me na?....
no dear.....i have got transfered...its fact re....i can never do such a majak atlest with u na???
पण मग हे कधी झाल..तू मला काहीच बोलली नाहीस....हि गोष्ट आता सागतियेस तू..??
अरे हे सगळ झाल fridaylach .......पण मी मुद्दामच आता सांगितलं नाहीतर sat -sun पण आपले खराब गेले असते...
आता अखे दिवस खराब जाणारेत आणि तू sat -sun काय घेऊन बसलीयेस.....shhit.......कधी जॉईन व्हायचंय तुला तिकडे....
from 1st ...आधी मला घरी जायचंय...मग पुढे बँगलोर....
हेय मग एक काम कर ना.....first u l come to pune.....we will go at my home and then u will go to kolhapur....and let me know when u will be leaving for banglore...i will come there to recieve you...
thats so sweet of you dear....i will miss you.....my iitan..."असं म्हणून ती...माझ्या मिठीत आली.....
"i will miss u tooo sona....hey by the way change the job....wat say....????
r u kidding??
no...i m damned serious......just change the bloody hell job...
just calm down na....instead of that u l try and get a job in banglore...wat say...???
lets see...."
सूर्य अस्ताकडे चालला होता...माझ्या गोष्टीने मात्र trackch change केला होता.....marine drive वर ह्यापुढे मी एकटा हि कल्पनाच मला करवत नव्हती.....
आधार...४
सई...चित्र काढत बसली होती....तीची काळजी घेयला....तिला आधार म्हणून एक बाई ठेवल्या होत्या...त्या पण तिथेच होत्या...मी तिच्या शेजारी जाऊन बसलो...ती घाबरू लागली...मी तिला म्हणल....
"काय सुंदर धबधबा काढलायेस तू....तू पाहिलायेस असा धबधबा कधी...??"
ती काहीच बोलली नाही...आणि मी तिला बोलत करायचा निश्चय केला होता...तेवढ्यात त्या बाई म्हणाल्या...
"काय हो तिला त्रास देताय...शांत बसलीये न ती..तुम्हाला पाहवत नाही का..??
हो ना हो काकू...शांत बसलीये हेच तर पाहवत नाहीये...." मी चटकन उठून बाहेर गेलो..माझ्या sag मधली एक पिशवी काढली...त्यात वेगवेगळ्या रंगाच्या टिकल्या होत्या...मी सईजवळ गेलो....तिच्या हातातून तिची वही घेतली आणि मी टिकल्यांच नक्षीकाम करू लागलो...माझ्या बहिणीने मला ते शिकवलं होत..थोडावेळ सई तशीच बसून राहिली...मग हळूच येयून डोकवून मी काय करतोय हे पहायचा प्रयत्न करू लागली...मी मुद्दामून वही लपवू लागलो...हळू हळू तो तिला खेळच झाला....तिनी डोकावून पहायचं आणि मी वही लपवायची.....पण ह्या सगळ्या खेळात नकळत का होईना ती सगळ विसरून हसायला लागली होती......मग शेवटी तिने ती वही घेतली....क्षणभर मी केलेल्या त्या नक्षीकडे पाहिलं.....छदमी हसली....आणि क्षणार्धात तिने त्या टिकल्यांचा गणपती बनवला....मला दाखवला..तिच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून मी त्या गणपतीलाच प्रार्थना केली कि "देवा...एवढी प्रचंड बुद्धिमत्ता, एवढं देखण रूप, एखाद्या जीवाला तू देतोस मात्र त्याच्याकडून काही ना काही काढून घेतोस आणि तो निराधार बनतो....देवा, हि एकच नाही असे अनेक लोक ह्या भूतलावर असतील कि ज्यांना आम्ही सगळे अपंग, म्हणतो....देवा आमचा हा भ्रम दूर कर....सगळ्यांना हे कळू दे कि आपण सगळेच अपंग आहोत...छोट्या छोट्या गोष्टीसाठी नेहमीच आपल्याला देवाचा म्हणजे तुझा आधार हा लागतोच...मग काय तू आम्च्याशी असा वागतोस..??"
त्याचक्षणी माझ्या खिशातल पेन मी काढल आणि सईच्या हातावर ठेवलं....ती आणखीच खुश झाली...आणि म्हणाली...
" पेन कशाला दिला..मी पेन्सीलनेच काढते चित्र...."
ते ऐकून मी हसलो....
"बर बाळा उद्या नक्की पेन्सील देईन तूला..."
निरागस सगळीच लहान मुल असतात....पण ते लहानपण...मी सईमध्ये आज प्रथमच पाहिलं होत... Thursday, June 16, 2011
आधार...
माझ्या मनातल्या आधार शब्दाची व्याख्याच त्या मुलीने बदलून टाकली होती....मी त्याच क्षणी त्या मुलीजवळ गेलो....ती जरा घाबरली.....मी तिच्याशी जाऊन बोलायचा प्रयत्न केला पण ती तिथून निघून गेली....बहुदा तिला काहीतरी नवीन वाटल असाव...आपल्याशी कुणीतरी येयून बोलतय ही कल्पनाच तिने कधी केली नसावी.....मी मात्र निर्धार केला होता...तिच्याशी गप्पा माराय्च्याच.....मी सुनीलच्या आईकडे गेलो....त्या खूपच सध्या होत्या....मी त्यांच्याशी बोलू लागलो...
" काकू, कश्या आहात....काही मदत करू का तुम्हाला??
नको रे मदत कसली...तू काय म्हणतोयेस??....कशी चाललीये नौकरी...?? काय लग्नाचा विचार वगरे...??.
हे काय काकू....मी तुमच्याशी इथे एवढ्या चांगल्या गप्पा मारायला आलो आणि तुम्ही काय तर लग्न??
अरे मी सहजच विचारल....
बर बर.....काकू मी एक विचारू...???
काय रे....??
सई.....ही अशीच आहे पहिल्यापासून?
अरे तुला काय सांगू आता....खूप देखणी आहे रे माझी सई....पण हे लोक तिच्याशी नीट वागत नाहीत....ह्या सगळ्यात त्या निरागस जीवाचा काय दोष आहे सांग ना....???......हा झालाच तर माझा दोष असेल....आणि त्यांच्या डोळ्यातन पाणी आल.....पोरा.....दुधाची साय व्हायला दुधाला किती आगीत झीजाव लागत.....पण माझी पोर जरा जास्तच झिजली......बर जाऊ दे...तू काही बोलू नकोस....आणि मलाही बोलत करू नकोस...
लग्नाच घर आहे....जीवावर दगड ठेवून एकीला सासरी पाठवायचं आणि दुसरीला खोलीत डांबायचं ....असो मला बरीच काम आहेत....असं म्हणून पद्रानी डोळे पुसत त्या तिथून निघून गेल्या....
एव्हाना माझ्याही डोळ्यात आश्रू आलेच होते...त्य माउलीच्या मनातली चलबिचल मी त्यांच्या डोळ्यात पहिली होती...त्यांच निराधारपण .....त्यांच अपंगत्व साफ दिसत होत....मी डोळे पुसले आणि सईला शोधू लागलो....
Subscribe to:
Posts (Atom)