माझ्या मनातल्या आधार शब्दाची व्याख्याच त्या मुलीने बदलून टाकली होती....मी त्याच क्षणी त्या मुलीजवळ गेलो....ती जरा घाबरली.....मी तिच्याशी जाऊन बोलायचा प्रयत्न केला पण ती तिथून निघून गेली....बहुदा तिला काहीतरी नवीन वाटल असाव...आपल्याशी कुणीतरी येयून बोलतय ही कल्पनाच तिने कधी केली नसावी.....मी मात्र निर्धार केला होता...तिच्याशी गप्पा माराय्च्याच.....मी सुनीलच्या आईकडे गेलो....त्या खूपच सध्या होत्या....मी त्यांच्याशी बोलू लागलो...
" काकू, कश्या आहात....काही मदत करू का तुम्हाला??
नको रे मदत कसली...तू काय म्हणतोयेस??....कशी चाललीये नौकरी...?? काय लग्नाचा विचार वगरे...??.
हे काय काकू....मी तुमच्याशी इथे एवढ्या चांगल्या गप्पा मारायला आलो आणि तुम्ही काय तर लग्न??
अरे मी सहजच विचारल....
बर बर.....काकू मी एक विचारू...???
काय रे....??
सई.....ही अशीच आहे पहिल्यापासून?
अरे तुला काय सांगू आता....खूप देखणी आहे रे माझी सई....पण हे लोक तिच्याशी नीट वागत नाहीत....ह्या सगळ्यात त्या निरागस जीवाचा काय दोष आहे सांग ना....???......हा झालाच तर माझा दोष असेल....आणि त्यांच्या डोळ्यातन पाणी आल.....पोरा.....दुधाची साय व्हायला दुधाला किती आगीत झीजाव लागत.....पण माझी पोर जरा जास्तच झिजली......बर जाऊ दे...तू काही बोलू नकोस....आणि मलाही बोलत करू नकोस...
लग्नाच घर आहे....जीवावर दगड ठेवून एकीला सासरी पाठवायचं आणि दुसरीला खोलीत डांबायचं ....असो मला बरीच काम आहेत....असं म्हणून पद्रानी डोळे पुसत त्या तिथून निघून गेल्या....
एव्हाना माझ्याही डोळ्यात आश्रू आलेच होते...त्य माउलीच्या मनातली चलबिचल मी त्यांच्या डोळ्यात पहिली होती...त्यांच निराधारपण .....त्यांच अपंगत्व साफ दिसत होत....मी डोळे पुसले आणि सईला शोधू लागलो....
No comments:
Post a Comment