एकदा जाहले...मन हे बावरे.....तू पाहिले .....मन हे भुलले
ते ही म्हणले मला, प्रेम कर तू जरा
आली ही वेळ अशी सावळी, जायचे सोडून...
मनात आहे जे सारे काही, टाकावे सांगून...
तूच श्वास आणि माझी हर प्रार्थना....
ते ही...
मनात चाललेलं सगळ काही ह्या कवितेन इतक्या सहजपणे सांगून टाकल होत....मी ताबडतोब ती कविता fair केली.....मनातली चलबिचल मात्र कायम होती...पण तरी मी डोळे मिटून झोपायचा प्रयत्न करू लागलो....सकाळी लवकर उठलो....पटकन आवरलं....दादरला पोचलो...९:२५ झाले होते...मी घाईघाईने platform गाठला.....नजर आणि मन एकाच गोष्टीचा विचार करत होते...९:३५ झाले..ट्रेन आली...मी लगबगीने डब्ब्यात चढलो....ट्रेन त्यादिवशी गच्च भरली होती...मी तसाच रेटत रेटत आत जायचा प्रयत्न करू लागलो...मी आत आलो...नेहा आत बसली होती...तिला कधी एकदा ती कविता दाखवतोय अस झाल होत..पण गर्दीच इतकी होती की आम्ही एकमेकांकडे फक्त पाहू शकत होतो...शेवटी विक्रोळी आल...आम्ही उतरलो....नेहा कुठल्यातरी कामात गुंतली होती...तिचा हात धरला आणि तिला कविता वाचून दाखवायला सुरुवात केली....पण तीच काही लक्षच नव्हत.....ती कुणाला तरी message करण्यात गुंतली होती....मला जरा वेगळ वाटत होत...नेहमी डोळे मिटून माझी कविता ऐकणारी नेहा आज लक्ष पण देत नव्हती...एवढ काय काम होत तिला....म्हणून मी तिला विचारल...
" सोना, काही problem आहे का?...कुठल्या कामात एवढी गुंतालीयेस की तुझ कवितेकादेपण लक्ष नाहीये.....
अरे कुठे काय...??....मस्त आहे रे कविता...एकदम आपल्या present situation ला अनुसरून आहे...
हो का??? तुला आवडली....??? चला म्हणजे तू ऐकलीस तर...
चल आता मला गेल पाहिजे....शेवटी शेवटी बॉस बोलेल नाहीतर मला....अस म्हणून ती निघून गेली....मला सारख काहीतरी वेगळ वाटत होत...मी पण IIT मध्ये गेलो...तिथे मित्रपण कशात तरी busy होते .....आज दिवसच बेकार आहे अस म्हणून मी माझ काम करू लागलो.....तेवढ्यात मला msg आला...नेहाचा होता...
"आज संध्याकाळी...urgently hanging garden च्या resort मध्ये मला भेट"....सोना....
"आज संध्याकाळी...urgently hanging garden च्या resort मध्ये मला भेट"....सोना....
मला काही कळेना....काय झाल होत...आणि एकदम hanging garden ......????
No comments:
Post a Comment