Monday, June 27, 2011

आधार....५

लग्नाचा आदला दिवस आला....सगळीकडे पाहुण्यांची नुसती धूम होती....सुनीलतर खूपच कामांमध्ये अडकून गेला होता.....त्याची आईपण दिवसभर पाहुण्याच पाहण्यात गुंतून गेली होती...सई मात्र तशीच एकटी तिच्या खोलीत बसली होती...तिच्यासाठी काहीच नवीन नव्हत...मी आसच बोलता बोलता...सईच्या बाबांना विचारल...
"काका सईला सुधा बाहेर आणायला पाहिजे ना....तिला पण वाटतच असेल ना कि आपण पण नटाव....छान नवीन कपडे घालावेत...सगळ्यामध्ये मिसळून रहाव...
असं काही नाही वाटत तिला....तिला एवढा विचार करायला सुचलं पाहिजे.....आणि ती तर अपंग आहे...जगायचा विचार करते एवढ पुरे आहे...."
स्वताच्या मुलीबद्दल एवढ वाईट कदाचितच कोणी बाप बोलला असेल.....मला त्यावेळी काकांचा खूप राग आला...मी काहीच बोललो नाही....मी फक्त काकांना त्यांच्या विचारानंमधलं अपंगत्व त्यांच्या निदर्शनास आणून देयच ठरवल...
शेवटी लग्नाचा दिवस उजाडला...सगळ्या मंडळीनी रुखवत मांडला....त्या रुखवतात एक सुंदर गणपतीच चित्र सगळे अगदी आवर्जून पाहत होते...सगळे म्हणत होते....
" काय सुंदर काढलाय हो हे चित्र...इतका रेखीव गणपती..ते पण हातानी काढलाय....कौतुक आहे.....नंतर नवरी मुलगी म्हणजे...सुनीलची बहिण रुखवत पहिला आली...तिने तो गणपती पहिला...तिच्या डोळ्यात चटकन दोन थेंब आले.....ती धावत आपल्या वडिलांकडे गेली...त्यांचा हात धरून त्यांना घेऊन आली...त्यांना म्हणाली...
" बाबा....हे बघा...हे गणपतीच चित्र...आपल्या सयुनी काढलय.....ते पण माझ्यासाठी....
   काकांचे डोळे चमकले....त्यांनी चित्र पाहिलं...त्यांना काहीच सुचेना...इतक सुंदर चित्र सई काढू शकते  किंबहुना सई काही करू शकते ह्यावर त्यांचा विश्वासच नव्हता...त्यांचा चेहऱ्यावर आनंद मावत नव्हता....त्यांनी जोरात सईला हाक मारली...सई दचकली.....तिला वाटल आपल्या हातून काहीतरी चुकलय...म्हणून ती तशीच खोलीत आजून लपून बसली...तीच काही उत्तर येयीना हे पाहून काका, तिची ताई....तिच्या खोलीत आले...सई अक्षरशः थरथर कापत होती...काका तिच्याजवळ गेले...ती उभी राहिली...काकांनी तिच्या समोर हात जोडले...आणि म्हणाले 
" पोरी, मला माफ कर...तुला अपंग.....निराधार म्हणून मीच अपंग झालोय...माझ्या विचारांमधल अपंगत्व मीच जगाला दाखवून दिलाय.....नाजूक फुलाप्रमाणे असणार्या तुला मी काटा समजत राहिलो.....पण तसं समजत असताना माझ फुल मात्र कोमेजत चालल होत...हे माझ्या आत्ता लक्षात आल.....
सईचे डोळे पाण्यानी चिंब भरले होते...कधीनव्हे तिने पण आनंदाश्रू अनुभवले होते.....तेवढ्यात काकू धावत तिथे आल्या.....हे सगळ पाहून आम्हाला कोणालाच आश्रू आवरण शक्यच नव्हत...पण काकू माझ्याकडे आल्या..माझ्यासमोर हात जोडले आणि म्हणाल्या...
"आज तुम्ही माझ्यावर खूप मोठे उपकार केले आहेत...माझ्या सईला आज नवीन जन्म, जगण्याची नवी उमेद तुम्ही दिली....तिला खरा आधार तुम्ही दिला....तुमचे उपकार आम्ही कोणीच कधी विसरणार नाही..
आहो काकू, हे काय....ह्यात उपकार काय...मी फक्त सईला बोलत केल..तिच्या चित्रामधून...तिने सगळ्यांच्या बोलण्याला खोडून काढलं...तिच्या चित्रातून...तिने सिद्ध केल कि अपंग ती नाही आपण आहोत...आपण निराधार आहोत....कारण तिच्यासारख्या लोकांमागे तर देव हाक न मारताच उभा असतो...आधार देयला....

No comments:

Post a Comment