Sunday, June 19, 2011

आधार...४

 सई...चित्र काढत बसली होती....तीची काळजी घेयला....तिला आधार म्हणून एक बाई ठेवल्या होत्या...त्या पण तिथेच होत्या...मी तिच्या शेजारी जाऊन बसलो...ती घाबरू लागली...मी तिला म्हणल....
"काय सुंदर धबधबा काढलायेस तू....तू पाहिलायेस असा धबधबा कधी...??"
ती काहीच बोलली नाही...आणि मी तिला बोलत करायचा निश्चय केला होता...तेवढ्यात त्या बाई म्हणाल्या...
"काय हो तिला त्रास देताय...शांत बसलीये न ती..तुम्हाला पाहवत नाही का..??
हो ना हो काकू...शांत बसलीये हेच तर पाहवत नाहीये...." मी चटकन उठून बाहेर गेलो..माझ्या sag मधली एक पिशवी काढली...त्यात वेगवेगळ्या रंगाच्या टिकल्या होत्या...मी सईजवळ गेलो....तिच्या हातातून तिची वही घेतली आणि मी टिकल्यांच नक्षीकाम करू लागलो...माझ्या बहिणीने मला ते शिकवलं होत..थोडावेळ सई तशीच बसून राहिली...मग हळूच येयून डोकवून मी काय करतोय हे पहायचा प्रयत्न करू लागली...मी मुद्दामून वही लपवू लागलो...हळू हळू तो तिला खेळच झाला....तिनी डोकावून पहायचं आणि मी वही लपवायची.....पण ह्या सगळ्या खेळात नकळत का होईना ती सगळ विसरून हसायला लागली होती......मग शेवटी तिने ती वही घेतली....क्षणभर मी केलेल्या त्या नक्षीकडे पाहिलं.....छदमी हसली....आणि क्षणार्धात तिने त्या टिकल्यांचा गणपती बनवला....मला दाखवला..तिच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून मी त्या गणपतीलाच प्रार्थना केली कि "देवा...एवढी प्रचंड बुद्धिमत्ता, एवढं देखण रूप, एखाद्या जीवाला तू देतोस मात्र त्याच्याकडून काही ना काही काढून घेतोस आणि तो निराधार बनतो....देवा, हि एकच नाही असे अनेक लोक ह्या भूतलावर असतील कि ज्यांना आम्ही सगळे अपंग, म्हणतो....देवा आमचा हा भ्रम दूर कर....सगळ्यांना हे कळू दे कि आपण सगळेच अपंग आहोत...छोट्या छोट्या गोष्टीसाठी नेहमीच आपल्याला देवाचा म्हणजे तुझा आधार हा लागतोच...मग काय तू आम्च्याशी असा वागतोस..??"
त्याचक्षणी माझ्या खिशातल पेन मी काढल आणि सईच्या हातावर ठेवलं....ती आणखीच खुश झाली...आणि म्हणाली...
" पेन कशाला दिला..मी पेन्सीलनेच काढते चित्र...."
ते ऐकून मी हसलो....
"बर बाळा उद्या नक्की पेन्सील देईन तूला..."
निरागस सगळीच लहान मुल असतात....पण ते लहानपण...मी सईमध्ये आज प्रथमच पाहिलं होत...

No comments:

Post a Comment