Friday, June 12, 2020

ओढ़

ही कसली अनाम ओढ़
सतत बिलगून असते
मन गाभाऱ्याच्या  आत
ती सरकन कैसी शिरते

मग उनाड होते सारे
उन्मळून पडतो धीर
मनातील गोंधळ तेव्हा
नेमका होतो अधीर

अशावेळी स्मरतात 
आईचे ते बोल
सावरावे ठेचण्याआधी
न पडता विचारात खोल

वावटळीत विचारांच्या
ती ओढच हरवून जाते
मन शोधत असते तेव्हा
एक अनाम अल्लड नाते

नात्यांच्या गुंत्यामध्ये
मी गुंततो पुन्हा जेव्हा
अवचित दिसते मजला
ती अबोल ओढ़ तेव्हा

मग कळते सारे सगळे
उलगडताच साऱ्या गाठी
ही  तर ओढ़ होती
माझी तुझ्याचसाठी

                              - सौरभ नेने 

Thursday, June 11, 2020

प्रेमाची गोष्टं


दिवसास विचारले जेव्हा
तुज सवाल इतका आहे
का ऒढ इतुकी तुजला
रात्रीची अनाम आहे

दिवस म्हणाला तेव्हा 
तुज कळणार कधीही नाही 
प्रेम करणे कारण 
शिकविले जात नाही 

दिवसा मागे रात्र 
का होते कळले तेव्हा   
प्रकाशाच्या हाती हात  
अंधार देतो जेव्हा 

मी दिवस होतो सखे ग 
तू हो रात्रीची काया 
ह्या आयुष्यावर पाडू 
आपुल्या प्रेमाची छाया 

तेव्हा विचारीन पुन्हा मी 
दिवसाला चोख पणाने
रात्रीला भेटण्यासाठी 
का विरतोस आनंदाने  

तोही हसेल खुद्कन गाली 
म्हणता म्हणता मजला 
अरे तुलाच कळले नाही 
तू प्रेमाचा धडा शिकला  

                                   - सौरभ नेने 

Thursday, December 18, 2014

तू मला पहिले.... मी तुला पाहिले

प्रश्न:   तू मला पहिले....मन हे भाळले
           का कसे सांग ना..प्रेम अन जाहले

उत्तर:  मी तुला पहिले....मन हे भाळले
            गुंतल्या भावना...प्रेम अन जाहले

प्रश्न:   भेटली प्रीत ही...मेघ अन दाटले
           का कसे सांग ना....प्रेम अन जाहले

 उत्तर:  बरसले मेघ अन ...चिंब मी न्हाइले
             गुंतल्या भावना...प्रेम अन जाहले

 प्रश्न:  गोठल्या ह्या दिशा....क्षण हि स्थिरले
          का कसे सांग ना...प्रेम अन जाहले

 उत्तर:  स्तब्ध्ले मी जरी....श्वास झंकारले
             गुंतल्या भावना...प्रेम अन जाहले

प्रश्न:   पापण्या स्पर्शल्या...ओठ अन लाजले
          का कसे सांग ना...प्रेम अन जाहले  

 उत्तर:  बोलण्याआधी जणू , ओठ हे बोलले
            गुंतल्या भावना...प्रेम अन जाहले

प्रश्न:   बावरी वेळ ती...सावळे गीत हे...
          का  कसे सांग ना...प्रेम अन जाहले

 उत्तर:  ऐकता गीत हे...मन्मना वाटले
             गुंतल्या भावना...प्रेम अन जाहले


Tuesday, October 22, 2013

आनंदाश्रम.....२

"बाबाकाका बाबाकाका ......हे बघ मी चित्र काढलाय.....इशा धावत माझ्याकडे आली...
अरे वा बघू तरी आमच्या ईशाने काय काढलय ते....
मी ते चित्र हातात घेतलं.....त्याकडे हलक्या नजरेनी पाहिलं.....माझे डोळे थक्क झाले.....तिने स्वतःचच चित्र काढल होत...... पण त्याबरोबरच तिने आनंदाश्रमातील  दोन झाडं काढली होती......एका झाडावर लिहिल होतं ...'आई' आणि एका झाडावर लिहिल होतं 'बाबा'..... दोन सेकंद डोळ्यातले आश्रू अनावर झाले.....सई तेवढ्यात म्हणाली....बघू मला पण बघू दे!

तिने माझ्या हातातून ते चित्र घेतलं.....मी दोन मिनिट ईशाकडे पाहिलं.....तिला घट्ट मिठी मारली....आणि म्हणालो.....धन्य आहेस बाळ तू.....

"बाबाकाका एक विचारू..?
हो विचार कि....
बच्चू म्हणजे काय रे?
काय? बच्चू? अम्म्म्म....बच्चू म्हणजे लहान मुलगा अगर लहान मुलगी....
म्हणजे माझ्यासारखी?
हो अगदी तुझ्यासारखी, गोंडस, हुशार आणि थोडी खोडकर सुद्धा....
पण दुनियादारी सिनेमात तर ती शिरीन त्या श्रेयसला बच्चू कशी म्हणते मग...?
तू कधी पाहिलास दुनियादारी इशा?
अरे तुझ्याच tab मध्ये पाहिला काल....तू दिलेलास ना मला गेम खेळायला तेव्हा...पण तू ते सोड.....सांग ना मला.....ती बच्चू कशीकाय म्हणते?
आग राणी....जर तुझ्या जवळच , अत्यंत लाडक कोणी असेल ना तर त्याला लाडानी पण बच्चूच म्हणतात.....
हो? मग आईकाकू पण तुला बच्चू म्हणते?

तिचा पुढचा प्रश्न तयार होता .....ते ऐकून मी जरासा बिचकलोच .....काय अफाट हि बुद्धी , तल्लखपणा,

सांग ना बाबाकाका ....बरोबर आहे ना?

हो एकदम बरोबर आहे....मी मनात म्हणल.....आज कालची पिढी म्हणजे तुफान आहे.....
 
"आईकाकू, तू तर कधीच म्हणल नाहीस बाबाकाकाला बच्चू माझ्यासमोर... ?"

चला इशा....आता आपली आवरायची वेळ झाली.....बाहेर जायचय  ना......मग आवर पटकन....
हो कि नाही रे बच्चू....

सईने मला बच्चू म्हणल आणि त्या निरागस चेहऱ्यावर जी काही हास्याची चमक आली.....हिऱ्याची लकाकीही फिकीच त्यासमोर

हो हो....अर्थात...चला पटकन आवरा ....

कुठे जायचं आहे पण आपल्याला आईकाकू?

आग आनंदाश्रम

आनंदाश्रम....yesssss........hurrey....म्हणजे आज मी आई बाबांना भेटणार.....अस म्हणून इशा तयारीला गेली....

अरे हो....आनंदाश्रम.....तुमची ओळख करून देतो....

आनंदाश्रम म्हणजे  जिथे खुद्द आनंद आश्रयासाठी येतो....जिथे माणूस नात्यांसाठी नाही तर नाती माणसासाठी पायघड्या घालतात.....जिथे बालपण, तारुण्य आणि म्हातारपण ह्याचं मिश्रण होऊन एक नवीन वय तयार होत.....हो तोच...आनंदाश्रम......माझ्या आईबाबांचं स्वप्न.......माझा वर्तमान......आणि हो इशासारख्या असंख्य लोकांचा "आनंद्काळ.."


  

Thursday, October 17, 2013

आनंदाश्रम.....

संध्याकाळ झाली होती....मी चहा पीत बाल्कनीत बसलो होतो.....सूर्याच आसपास कुठेही नामोनिशाण दिसत नव्हत....आकाश जणू काही काळ्याभोर ढगांनी पुरत व्यापुन टाकल होत..मधेच विजांचा गडगडाट तर मधेच पक्ष्यांचा किवकीवाट कानी पडत होता....हे वातावरण जणू कोणीतरी कुठेतरी खूप दुःखी आहे तर कुणीतरी कुठेतरी चिंब भिजण्यासाठी उत्सुक आहे अशी प्रचीती करून देत नेहमी मला ....मी चहाच्या प्रत्येक घोटागणीक त्या वातावरणाशी एकरूप होत चाललो होतो....

"चहा कसा झालाय?", साखर पडलीये ना बरोबर?, माझ्याहातून कमी पडते म्हणून विचारलं....

मी मागे वळून पाहिलं.....नेहमीप्रमाणे काहीच न बोलता.....सईच सगळ बोलण मला ऐकू आल होत...तिचे डोळे बोलतातच मुळी इतक्या जोरात .....

"चांगला झालाय चहा"

" पाऊस येणारे खूप जोरात....मी सगळे कपडे आत घेते नाहीतर उगाच ओले होतील....तू आज कसाकाय एवढा निवांत...."

अरे हा पाउंस का येत नाहीये....पटकन येवून कोसळून जाऊ दे....कुणाच मन किती हलक होईल....त्याच दुःखं ह्या सारीन्बरोबर वाहून निघून जाईल.....तर कोणीतरी त्यात चिंब होऊन तृप्त होईल....

पण पाउस येतच नाहीये...

सगळ नेहमी इतका सोप नसत....श्रेयस....

म्हणजे

काही नाही.....

आज ईशाच्या पोलिओ डोस ची तारीख आहे....तिला नेयच आहे.बूथ वर ....पाउस येयील तेव्हा येयील.....आपल्याला निघायला हवय....

मोरे काका सकाळीच गेलेत....आश्रमात......जोशी आजींना अस्वस्थ वाटत होत....डॉक्टरांना घेऊन गेलेत.....
तिथेपण जाव लागेल आपल्याला ...चल पटकन आवर.....

सई......खरच .....लहानपण आणि म्हातारपण किती सारख आहे हे कस लोकांना कळत नाही...काही लोक लहानपाणी लोक सोडून जातात तर काही लोक म्हातारपणी लोक सोडून जातात....आज मला कळतंय....देवाने दोन वेळा आपल्याला बालपण जगायचा chance दिलाय......लोकांना हे जेव्हा कळेल ना तेव्हा बघ आपल्या सारख्या लोकांची गरजच उरणार नाही....

तेवढ्यात बेल वाजली....सईने दार उघडल....

" श्रेयस बघ कोण आलय........  

Wednesday, July 10, 2013

गझल.....

उजाडलेल्या सूर्याची किरणे शोषत होतो..
रात्रीची चाहूल घेऊन आलीस तू तेव्हा...

मनातल्या मनात चार शब्द जुळवत होतो...
गीत बनून ओठी आलीस तू तेव्हा...

गुंतलेल्या धाग्याची उकल शोधत होतो
गाठ बनून हाती लागलीस तू तेव्हा....

गुरफटलेल्या आयुष्यात राम शोधत होतो
सीता बनून तू भेटलीस मला तेव्हा

स्वतः मधले स्वत्व आरशात पाहत होतो...
सावली म्हणून तू दिसलीस कशी तेव्हा ?

गंधाळलेल्या फुलांमध्ये, सौरभ शोधत होतो
सरींसवे मातीत विरून , गंधाळलीस ग तेव्हा

रमलो होतो मिठीत कवितेच्या ग राणी
ओठ तुझे गाली स्पर्शून गेलीस ग तेव्हा


                                                               सौनिक

Sunday, July 7, 2013

काळ

काळ ....सरत जाणारा.....
आयुष्यात रुतत जाणारा...
क्षणांशी स्पर्धा करणारा ....काळ

पक्ष्यांसवे  सरकन उडणारा...
सरींसवे  चिंब भिजणारा
अनोळखी वाटेवरती हात हाती देणारा ....काळ

क्षितीजापारी अथांग असणारा...
समुद्रापरी निवांत असणारा
वाऱ्याच्या प्रत्येक लाटेवरती वाहणारा ......काळ

डोळ्यातली सारी स्वप्नं जाणणारा
 घडणारी हर गोष्ट पाहणारा...
जीवनातली प्रत्येक वेळ  जगणारा.....काळ.

काळ.....नेहमी वेळेबरोबर राहणारा...
घड्याळाबरोबर घडणारा
नकोतीथे...नको त्यावेळी बदलणारा.....काळ.....

                                                                       
                                                                         -  सौनिक
                                                                   

Monday, June 3, 2013

तू रे....

तू रे.....
मनातले हे भाव तू रे...
डोळ्यातले ते गाव तू रे ....
अनोळखीसे नाव तू रे....
तू सखा अन तूच तू रे...

ओठातले ते गीत तू रे
स्पर्शातले ते स्मित तू रे
गाजलेली रीत तू रे....
तू सखा तूच तू रे.....

दाटलेले मेघ तू रे
वाटलेले प्रेम तू रे
गुंतलेले श्वास तू रे.....
तू सखा तूच तू रे....

कल्पनांची वाट तू रे
भावनांची गाठ तू रे...
पेटलेली वात तू रे....
तू सखा अन तूच तू रे.....


आज तू अन काल तू रे
अनंत तू नि अंत तू रे....
दान तू वरदान तू रे
तू सखा अन ईश तू रे.....
तू सखा अन तूच तू रे.....

                                          - सौनिक ....

Thursday, February 7, 2013

सांजवेळा.....


मनाशी बोलणाऱ्या.....स्वतःला  मांडणाऱ्या
एकट्याला एकट्याशी बांधणाऱ्या...........सांजवेळा


ह्या जीवांना आस असते भेटण्याची
अंतरीचे भाव सारे सांगण्याची

ह्या मनाला त्या मनाशी जोडणाऱ्या ......सांजवेळा


दाटलेले दुःख येते मग भरून
मन असते हात-हाती अन धरून

अश्रूंनाही हासवून सांडणाऱ्या..........सांजवेळा


विसकटलेल्या भावनांना सावरून
मन म्हणते बघ जरा निरखून

तुझे निरोप तिलाही सांगणाऱ्या .....सांजवेळा....

Sunday, January 6, 2013

पुन्हा गोष्ट लोकलमधली - १२

डिसेंबर महिना चालू होता...आम्ही नुकतच त्या स्नेह्संमेलनाला जाऊन आलो होतो....मी आणि नेहा नेहमीप्रमाणे ऑफिसहून परत आलो होतो...आईने आमच्यासाठी मस्त चहा केला होता.... तो देत ती म्हणाली...
"रोहित...आज काय,  कसं झाल ऑफिस ?
मस्त झाल आई....आग आई....आज कोणाचा फोन आला होता माहितीये?
 कोणाचा रे ?
अग आशिष ....आम्ही त्याला जाड्या म्हणायचो .... नाही का .तो माझ्याबरोबर होता ...
हो  हो... काय म्हणतोय तो..? काय करतो सध्या...
काही नाही ग.... बंगलोरला असतो...नौकरी करतो
बर ....अरे वा....मग लग्न कुठे आहे....? बंगलोरला?
नाही....जयपूरला .....आपल्या सगळ्यांना बोलावलंय...
काय जयपूर? एकदम जयपूर कस?
मुलगी जयपूरची आहे...
नेहा म्हणाली.... love marriage  असेल....आई...त्याच....
नाही....नाही....arrange आहे
 बर बर....कधी आहे लग्न...?
३० डिसेंबरला आहे....आपल्याला जायचय....
हो आपण ह्यावेळी....आई बाबांना पण घेऊन जाऊ.... नेहा म्हणाली...
हो ते तर आहेच.....आई तु तयारीला लाग....बाबांना पण सांग...
अरे पण.....आम्ही कशाला....
नाही तुम्ही येणार आहात....." अस म्हणून मी स्वयंपाकघरात पाणी पेयला गेलो...तोच मला ह्या दोघींच्या गप्पा ऐकू येवू लागल्या....
" आई , जयपूरला साड्या खूप छान मिळतात , चपला पण खूप छान मिळतात ,  लग्न तर फक्त कारण आहे....आपण मस्त शॉपिंग करू तिथे.....
नेहा अगदी मनातल बोललीस बघ...आम्ही गेलो होतो रोहित लहान असताना जयपूरला पण तेव्हा तो नेमका तिथे आजारीच पडला....आणि आमच सगळ शॉपिंग राहील होत....पण,  हो रोहित एकटा गेला होता तेव्हा त्यानी माझ्यासाठी खूप सुंदर साडी आणली होती....खरच....आपण खूप शॉपिंग करू....तिथे "
मी पाणी पीत पीत विचार करू लागलो ....काय हे जाड्यानी ठेवून ठेवून लग्न जयपूरलाच का ठेवलाय..?


Thursday, January 3, 2013

पुन्हा गोष्ट लोकलमधली - ११

मग एक मुलगी उठली.....माईक हातात घेतला आणि म्हणाली...
"माझा प्रश्न रोहित सर आणि नेहा  madam  दोघांसाठी आहे......सर तुम्ही नेहा nadam च जे वर्णन करता गोष्टींमध्ये.....ते खरच खूप छान असत.....तुम्हाला नेहा  madam मधली  सगळ्यात नावडती गोष्ट कोणती आहे.... आणि  madam  तुम्हाला सरांची  सगळ्यात कोणती गोष्ट आवडते....?"
" बाळ, तुझ नाव काय?...खरच खूप मस्त प्रश्न विचारला आहेस"....नेहा म्हणाली....
 " माझं नाव जिगीषा कुरुंदकर ....."
 " जिगीषा पहिला प्रश्न सरांसाठी आहे तर पहिल्यांदी तेच उत्तर देतील अस म्हणून नेहानी माझ्याकडे माईक दिला....मला मात्र चांगल कोड्यात टाकल होत त्या प्रश्नानी....मी म्हणल....
"जिगीषा....आवडती गोष्ट सांगू का? खूप आहेत.....नावडत्या नाहीच आहेत.....असो....पण एक गोष्ट आहे कि जी मला आजीबात आवडत नाही नेहा मधली ती म्हणजे.....तीच माझ्यावर असणार प्रेम कि जे माझं तिच्यावर असणाऱ्या प्रेमापेक्षा कितीतरी पटींनी जास्त आहे....तिचा माझ्यावर असणारा विश्वास हा माझा तिच्यावर असणाऱ्या विश्वासापेक्षा कितीतरी पटींनी जास्त आहे......तिला हे सगळ सहज जमत.....आणि ते मला आवडत नाही.....कारण माझं तिच्यावर खूप प्रेम आहे....पण हे सगळ मला लिहून दाखवाव लागल लोकांना पण ती तिच्या वागण्यातूनच लोकांना दाखवून देते.... मला वाटत तुला मिळाल असेल उत्तर आता "
"हो सर.....आता madam तुमचं उत्तर "
"जिगीषा....माझी आवडती गोष्ट .... रोहितमधली....ती म्हणजे.....त्याचा साधेपणा.....आणि हो सगळ्यात महत्वाच म्हणजे....."नेहा".....कारण.....रोहित नेहाशिवाय अपूर्ण आहे आणे नेहा रोहितशिवाय....".
 पुन्हा टाळ्या कडाडल्या.......परत माईक शेगावकर सरांकडे आला....
"हा आता शेवटचा प्रश्न कोण विचारणार आहे....
"सर मी सर मी".....अस म्हणून एक मुलगा पुढे आला....
"माझा प्रश्न रोहित सरांसाठी आहे ....सर सौनिक म्हणजे काय?"
"सौनिक...मुलांनो....मी फक्त आता तुम्हाला एवढंच सांगू शकेन....कि लहानपणापासून...आपल्या मनात असंख्य गोष्टी घडत असतात ......पण त्या प्रत्यक्षात घडतातच अस नाही......त्या सगळ्या अप्रत्यक्ष मनातल्या गोष्टी म्हणजे...."सौनिक".....असच तुमचं प्रेम.....माझ्यावर राहू द्या...भरपूर वाचा.....हसा, खेळा हो पण तेवढाच अभ्यासही करा....Wish you all the best for your future.... धन्यवाद "

Monday, December 31, 2012

पुन्हा गोष्ट लोकलमधली - १०

परत निमगावकर सर व्यासपिठावर आले....आणि म्हणाले....रोहित तू सांगितलेल्या गोष्टी मुलं नक्की लक्षात ठेवतील...तू सांगितलेलं अगदी खर आहे ....आजची पिढी हे सगळ विसरली आहे....त्यांच्यासाठी ह्या गोष्टी खरच खूप महत्वाच्या आहेत...असो....आता मुलांनो....तुमची टर्न.....आर्थात उत्स्फूर्त संवाद ......तुम्ही मोकळे आहात आता आजच्या आपल्या प्रमुख पाहुण्यांना प्रश्न विचारायला...आणि हो..... नुसतं रोहित सरांनाच नाही तर नेहा ताईंना पण विचारा....पहिला प्रश्न कोण विचारणार आहे?  हम्म आकाश विचार..
आकाश जवळ एक मुलगा माईक घेवून गेला ... आकाश म्हणाला 
" माझा प्रश्न रोहित सरांसाठी आहे...सर, तुम्ही एवढा सगळ लिहित होता.....त्याबरोबर आयआयटी मध्ये अभ्यास कसा सांभाळत होता?.."
मी म्हणालो " आकाश ....तू प्रश्न चांगला विचारला आहेस...पण तुला मी सांगतो कि हे सगळ मी लिहित गेलो तो माझा छंद म्हणून....आणि जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट छंद म्हणून करता तेव्हा ती तुमच्या आभ्यासाच्या कधीच मध्ये येत नाही....पण हा...जर तुम्ही अभ्यास नको म्हणून जर सारखी ती गोष्ट करायला लागलात तर मग आवघड आहे...तेव्हा तात्पर्य काय...कि छंदाला छंदच राहू द्या....त्याची सवय करू नका.......कळल ??"
"  हो सर....कळल ना...." आकाश म्हणाला...
बऱ्याच मुलांनी प्रश्न विचाराय्साठी हात वर केले होते.....मग केतकी उठली आणि तिने विचारल...
"माझा प्रश्न नेहा madam साठी आहे ,  madam, तुम्ही खरच प्रथम लोकलमध्ये भेटलात का सरांना ? आणि तेव्हाचे सर आणि आत्ताचे सर ह्यात काही फरक वाटतो का तुम्हाला?"
नेहानी माझ्याकडून माईक घेतला......आणि ती म्हणाली....
"नमस्कार मुलांनो....तुम्ही खरच सगळे खूप गोड आहात....खूप शांत पण आहात...आम्ही आमच्या शाळेत इतके कधीच शांत बसत नव्हतो....असो....केतकी......तू वाचलीयेस का गोष्ट लोकलमधली ?"
"हो  madam...."
बर...पण केतकी.....हि गोष्ट खारीये कि मी रोहित सरांना लोकलमधेच भेटले....पण तुला मी खर सांगते कि तेव्हा मला वाटलच नव्हत कि आपण हे सगळ काही जगतो आहो ते रोहित डोक्यात साठवतोय आणि ते तो लिहून काढणार आहे....त्यातल्या लेखकाला मी तेव्हा भेटलेच नव्हते.....अर्थात त्याने मला भेटवलच नव्हत...पण जेव्हा मी स्वतः ती गोष्ट वाचली.....तेव्हा माझं रोहित सरांवारच प्रेम ....त्यांच्या बद्दलचा माझा आदर आजून वाढला....आणि आजून एक.....त्यावेळेचे रोहित सर आणि आत्ताचे रोहित सर ह्यात फक्त एकच फरक आहे कि तेव्हा तो फक्त रोहित होता पण आता तो सौनिकपण आहे......"
सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या....मग निमगावकर सर स्वतःच उठले आणि म्हणाले...
" पुढचा प्रश्न मी विचारणार आहे...रोहित आधार गोष्ट कशी सुचली तुला? 
"सर , आधार हि एक फार सुंदर गोष्ट आहे...मला माझ्या लिखाणातली सर्वात आवडलेली गोष्ट....पण ती मला सुचली एका बागेमध्ये...त्या बागेमध्ये एक फार रहीस कुटुंब आपली २-३ कुत्री, त्यांना सांभाळण्यासाठी  असलेले २ माणस आणि एक व्हील चेयर वर बसलेली मुलगी आणि तिला घेऊन जाणारी बाई असे सगळे घेऊन फिरायला येत असत...." रोज ते तिथे येयचे...रोज ती व्हील चेयर वरची मुलगी त्या बागेतल्या फुलांकडे...फुलपाखरांकडे बघून मनसोक्त हसायची...तिथे खेळणाऱ्या मुलांकडे पाहून स्वतःला आनंदित करून घेयची....पण ती कधीच त्या चेयर मधून उठत नसे....एकदा मी त्या बाईला विचारल....म्हणल.....
"कहो बाई....हि मुलगी रोज इथे येते....हसते ....मुलांकडे पाहून आनंदित होते...पण कधीच स्वतः त्यांच्यात जात नाही....तेव्हा ती बाई म्हणाली...."सर , तिचा एक पाय नाहीये....ती उभी राहू शकत नाही.....आधी ती खूप खेळत असे.....बागडत असे...पण आता नाही..."
ते ऐकून क्षणभर डोळे पाणावले.....आधारच महत्व मला तेव्हा कळल...आणि त्यातूनच आधार गोष्टीचा जन्म झाला...."
 



Sunday, December 23, 2012

पुन्हा गोष्ट लोकलमधली - ९

" " आई" ....माझी सगळ्यात लाडकी कविता.....आणि तीच मी त्या स्नेहसंमेलनात वाचणार होतो...असो....आज मी तुम्हा सगळ्यांना त्या कवितेचा शेवट ऐकवतो....

" हे देवा!! ज्यांना नाही ही आई
  त्यांना कोण बरे तारी
  माझा धन्यवाद तुला
  तू दिलीस मला आई  "

पुन्हा टाळ्या कडाडल्या...." मुलांनो , आई ह्या शब्दाशी माझ्यामते प्रत्येकाच एक अलौकिक नातं असतं....तसं माझंपण आहे.....आज जे काय ....जसा काय मी तुमच्यासमोर उभा आहे तो केवळ आणि केवळ माझ्या आई आणि बाबांमुळे आहे.....हे लिखाणाच बाळकडू तिने मला खूप लहानपणापासून दिल.....ते म्हणजे निबंध लेखनातून....खरच तिने निबंध ला "नि" + "बंध" का म्हणतात हे मला पटवून दिलं आणि मला लिखाणच जमायला लागल...तेव्हा मुलांनो, तुम्ही आत्ता ज्या वयात आहात त्या वयात.....खरच खूप खेळा, मज्जा करा....आनंद लुटा....पण त्या बरोबरच  आईचं म्हणन नेहमी ऐका....ती व्यक्ती कधीच तुम्हाला काहीही चूक सांगूच शकत नाही....ह्यापुढच जीवन अधिक अधिक वेगवान होत जाणारे....तुम्हाला तुमचा तोल सांभाळायचा आहे...तोल संभाळण तुमच्या आईकडून शिकून घ्या.....प्रेम कारण आणि प्रेम देण तुमच्या आईकडून शिकून घ्या....
मित्रांनो, तुमच्यापैकी काही मुलांनी माझ्या ब्लोगवरची आधार गोष्ट वाचली असेल....मला तुम्हाला एवढच सांगायचं आहे की.....जो गरजू आहे त्याला नक्की मदत करा....त्याला नक्की आधार द्या....पण कोणालाही कधी आधाराची सवय लावू नका.....कारण त्याची एकदा सवय लागली कि माणूस पाची इंद्रियांनी दणकट असूनही कुबडा होतो.....
मुलांनो , शेवटची पण अतिशय महत्वाची गोष्ट....तुम्ही ज्या कोणाबरोबर राहता....त्या प्रत्येक माणसाला ओळखायला शिका....तुम्ही एकदा ओळखायला शिकलात की तुम्हाला कोणी भुलवू शकत नाही....तुमचा कोणी फायदा करून घेवू शकत नाही.....बाकी तुम्ही सगळे खूप हुशार तर आहातच पण भरपूर अभ्यास करा....वाचा ....खेळा आणि सतत सुख शोधत बसण्यापेक्षा....आलं त्यला सुख मानत चला.....बघा सुख आपोआप तुमच्याकडे येयील आणि तुम्ही  नेहमी आनंदी रहाल.....
मला इथ बोलावलत...एवढा मोठा मान दिला त्याबद्दल तुमचे मनापासून आभार....हि शाळा अशीच पुढे जाओ अश्या शुभेत्छां देतो...धन्यवाद"

परत टाळ्यांचा कडकडाट झाला .....मी माझ्या जागेवर परत येयून बसलो....नेहानी हळूच तिचा हात माझ्या हातावर ठेवला....माझ्या भाषणाला मिळालेली ह्यापेक्षा मोठी दाद असूच शकत नाही.....

Sunday, October 7, 2012

पुन्हा गोष्ट लोकलमधली...८

"सुस्वागतम , सुस्वागतम ,

सरस्वती विद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलनात आपल्या सर्वांच स्वागत आहे..
मी मालिनी देशपांडे आपले सगळ्यांचे स्वागत करते..
सर्वप्रथम मी आजचे प्रमुख पाहुणे श्री. रोहित आणि सौ. नेहा गोरे ह्यांना दीप प्रज्वलन करण्याची विनंती करते.."

हे सगळ मला अगदी वेगळ वाटत होत....नेहमी स्टेजच्या खाली बसून गप्पा मारणारा....कधीही भाषण म्हणल, लोकांसमोर बोल म्हणल की नेहमी नाही म्हणणारा....आज त्याच स्टेज वर प्रमुख पाहुणे म्हणून आला होता आणि बोलणार पण होता...मी आणि नेहा दोघही दीप प्रज्वलन करायला उठलो....नेहा नेहमीप्रमाणेच तिथे असणाऱ्या सगळ्या बायकांमध्ये उठून दिसत होती...तिने गर्द हिरव्या रंगाची साडी नेसली होती...हातात मी दिलेलं ब्रेसलेट घातलं होत...केस काहीतरी वेगळ्याच पद्धतीने बांधले होते......नाकातली मोरणी त्या फोकस लाइट्स मध्ये चकाकत होती.... थोडक्यात काय ती सुंदर दिसत होती......दीप प्रज्वलन झालं...आणि परत मालिनी देशपांडे बोलू लागल्या

"विद्यार्थ्यांनो,

  आजचा दिवस खूप खास आहे...कारण आज आपण गोष्ट ऐकणार आहोत...एका खूप वेगळ्या माणसाकडून
त्यांची ओळख करून देयला मी बोलावते निमगावकर सरांना"
 टाळ्या वाजल्या....आणि निमगावकर सर बोलू लागले..

"मित्रांनो,

आज आपल्याला जे व्यक्तिमत्व प्रमुख पाहुणे म्हणून लाभल आहे...ते फार वेगळ आहे....काही वर्षांपूर्वी अशाच स्नेहसंमेलनात कविता म्हण म्हणून ज्याच्या आम्ही सगळे खूप मागे लागलो होतो....तोच हा रोहित गोरे......त्याने खास मला सांगितलं की सर मला आहो जाहो म्हणू नका....म्हणून मी एकरांत बोललो....त्याने आयुष्यात खूप काही मिळवलं, engineering, M.tech ते पण IIT मधून.....पण असं असूनही त्यानी त्याची लिखाणाची आवड तशीच जपली आहे...हे मला तेव्हा कळलं जेव्हा मी त्याचा ब्लॉग वाचला....त्याचक्षणी मी ठरवलं होत की त्यालाच बोलवायचं ह्यावेळी स्नेहसंमेलनात प्रमुख पाहुणे म्हणून....
आणि मुलांनो गोष्ट झाल्यावर तुम्ही त्याला प्रश्न विचारायचे आहेत.....तेव्हा आता जास्त वेळ न घेता मी सरळ माईक रोहितच्या हवाली करतो...."

पुन्हा टाळ्यांचा कडकडाट झाला...मी माईक जवळ गेलो.....आणि पहिला शब्द उच्चारला...

"आई "






Friday, October 5, 2012

कधीतरी....एक आशा

कधीतरी नको वाटतील...लुबाडणारे हात
कधीतरी १०:१० हून पुढे....सरकेल हे घड्याळ
कधीतरी बदलेल काळ वेळ आणि गती
सामान्यांना जाव लागणार नाही उगाच मग सती 

कधीतरी चालतील गाड्या सूर्य शक्तीवर
तेव्हा दिसेल पेट्रोल विकलेले रस्त्यावर
कधीतरी वादळ घेऊन येयील नवी क्रांती
सामान्यांना जाव लागणार नाही उगाच मग सती

कधीतरी अन्नाशिवाय सुखी होईल जीवन
पाण्याशिवाय जमिनी होतील अन श्रीधन
कधीतरी आयुष्याला नसेल कसलीच भीती
सामान्यांना जाव लागणार नाही उगाच मग सती

कधीतरी होईल भ्रष्टाचाराची सवय
नेत्यांनाच वाटेल तेव्हा पैसे खाण्याचे भय
कधीतरी होईल त्यांच्या भुकेची माती
सामान्यांना जाव लागणार नाही उगाच मग सती



                                                                          - सौनिक 

Tuesday, September 18, 2012

पुन्हा गोष्ट लोकलमधली...७

मी  ट्रेन मधून परत हॉटेल वर चाललो होतो ...तेवढ्यात  एक मेल आला....मी ओपन केला ...त्यात लिहल होत...
आदरणीय सर,
                      स.न .वि.वि 
मी सर्वप्रथम माझी ओळख करून देतो. मी मनोज निमगावकर ....हेडमास्तर , सरस्वती विद्यालय, औरंगाबाद . मी आपले ब्लॉग नियमित वाचतो आणि ते मला खूप आवडतात...हल्लीच तुम्ही लिहलेली , ""मरीन लाईन्स, समुद्र आणि मी ही गोष्ट तर खूपच मनाला भावणारी आहे...त्यात मांडलेली समुद्राची व्यथा आणि त्याला जबाबदार असणारी संपूर्ण मानवजाती ह्याची सुंदर आणि मार्मिक  मांडणी त्यात केली आहे....मी ह्या गोष्टीनी खूप प्रभावित झालो आहे. माझी तुम्हाला एक विनंती आहे ......येणाऱ्या आमच्या शाळेच्या वार्षिक स्नेहसंमेलनात कृपया आपण मुलांना एक छोटी का होईना गोष्ट सांगावी....कारण ह्या देशाच्या येणाऱ्या भविष्याची कल्पना ह्या देशाचे भविष्य असणार्या ह्या मुलांना कळणं आवश्यक आहे....तरी आपण आपल्याला योग्य असणार्या तारखा मला कळवाव्यात....आणि येताना नेहा madamला पण घेऊन या ...मला त्यांना भेटायची फार इच्छा आहे..त्या तुम्ही लिहल्या आहेत तशाच आहेत का ह्याची मला खुप उत्सुकता आहे....आपण नक्की याल असे गृहीत धरूनच मी कार्यक्रमाची रूपरेषा आखणार आहे .....आणि हो अश्याच गोष्टी लिहित रहा....धन्यवाद 

आपला कृपाभिलाषी ,
          मनोज 

त्यांनी शेवटी त्यांचा नंबर आणि पत्ता दिला होता.....मला एकदम काही कळेनाच....मी आणि मुलांना गोष्ट .....हे काहीतरी विचित्र वाटत होत..आणि माझ्यापेक्षा नेहालाजास्त आग्रहाच आमंत्रण होत .....बहुदा .....मी जरा जास्तच चांगल लिहलय तिच्याबद्दल गोष्टीमध्ये असं मला वाटल....पण....मनाला समाधान पण वाटल....आपल लिखाण जाणणारे  आणि ते इतरांपर्यंत पोहचाव म्हणून प्रयत्न करणारे पण लोक आहेत हे पाहून मला खूप आनंद झाला....मी ताबडतोब त्या मेलला reply  लिहिला ...

नमस्कार मनोज सर ,

                              आपले खूप खूप आभार मला ह्यायोग्य सामाज्ल्याबद्दल....पण मी इतका मोठा नाही....लिखाण हा माझा छंद आहे .....तुम्हाला हे लिखाण खूप आवडल हे ऐकून खूप आनंब्द झाला ...मी तुमच्या शाळेत नक्की येयीन....पण एक विद्यार्थी म्हणूनच....त्या विद्यार्थ्यांशी गप्पा मारायला.....तेव्हा कोणतीही औपचारिकता नको....आणि हो मी नेहाला नक्की आणीन...तिला पण मुलांच्यात राज्मायला खूप आवडत....तेव्हा तुम्ही सांगाल ती तारीख मला मान्य असेल.....मी नक्की येयीन.....धन्यवाद 

आपला आज्ञाधारक,

      रोहित   


Thursday, September 6, 2012

पुन्हा गोष्ट लोकलमधली ....६

"भय्याजी, २ पानीपुरी लगावो.....
नेहा , आग मला नकोय....
अरे  काय रे....मी एकटीने खायची का मग?  शेट बाबा, तू असाच करतोस...
बर्र ऐक न एक काम करू ,एक प्लेट घेऊ आणि एकत्र खाऊयात.....चालेल
आता कस बोललास माझ्या मनातल....:"
त्या भय्याने लगेच पाणीपुरी बनवली.....पहिली पाणीपुरी नेहाने घेतली....तिच्या चेहऱ्यावरच समाधान अलौकिक होत.....तीच ते निरागस सोंदर्य अनुभवायची परत एक संधी मला ह्या पाणीपुरीने दिली होती....
" जानू, काय म्हणतोय तुझा समुद्र?,  आणि तुझा marine drive? ,  नेहा म्हणाली....
  काही नाही...नेहमीसारखाच फुललेला...होता  marine drive आणि माहितीये शोना , आज परत त्यानी मला  नकळत ती गोष्ट दिली...जी माझ्या हृदयाच्या अत्यंत जवळ आहे.....
हो ते मला माहितीये....पण जानू हे marine drive,  समुद्र आणि मी .....हि गोष्ट तुझ्याशी रीलेटेड आहे का?
का  ग? आज वर कधी तू मला माझ्या ब्लॉग बद्दल विचारल नाहीस आणि आज एकदम...
नाही असच....सांग ना....
सांगीन निवांत.....पण आता आपल्याला हॉटेलवर गेलं पाहिजे ...आपल्याला दोघांनाही ८:३०-९ ला परत बाहेर पडाव लागेल.." 
एकदाची ती पाणी पुरी आटोपली...आम्ही  taxi  पकडली आणि निघालो... हॉटेलला पोहचलो....थोड्यावेळ आराम केला आणि परत  बरोबर ९ ला बाहेर पडलो....नेहाला अंधेरीला जायचं होत..  ती वेस्टर्न ने निघाली आणि मी सेन्ट्रलने ठाण्याकडे निघालो...... माझ्या बोल्ग्वरची हि नवीन गोष्ट लोकांना खरच खूप आवडत होती....पण त्यापेक्षाही नेहाला ती कुठेतरी माझी गोष्ट वाटत होती हे ऐकून थोडा आनंदही झाला आणि थोड आश्चर्यही वाटलं....पण ह्या पाणीपुरी आणि गोष्टीच्या नादात तिच्यासाठी घेतलेल्या बांगड्या तिला देयच्या मी विसरलो होतो....हे माझ्या लक्षात आल...तेवढ्यात आज खूप दिवसांनी मी विक्रोळी स्टेशन वरून गेलो ....अन एकदम जुन्या आठवणी जाग्या झाल्या....



Wednesday, August 29, 2012

पुन्हा गोष्ट लोकलमधली.....५

" हेलो नेहा, कुठपर्यंत आली आहेस?
  मी कल्याणला पोह्च्लीये...तू कुठे आहेस?
  मी आलोय दादरला.....इस्टलाच उतर....मी थांबलोय platformवर"
  पहाटेचे ५ वाजत होते...मी कसे बसे डोळे उघडे ठेवत होतो...तेवढ्यात  announcement झाली...ट्रेन वेळेवरच येणार असल्याचे त्या बाईने सांगितले.....पहाटेच दादर स्टेशन म्हणजे तर बेघर लोकांच वसतिगृहच होऊन जात.....जिथे जागा मिळेल तिथे लोक झोपतात...जे मिळेल ते खातात......हे सगळ पाहून खरच त्या लोकांची दया येते....सगळ्या गोष्टींच होणार बाजारीकरण आणि त्यामुळे आयुष्याचा घसरत चाललेला भाव....हीच त्यामागची कारण.....तेवढ्यात पुन्हा announcement झाली....मी A/C च्या बोगी येतील अश्या ठिकाणी जाऊन उभा राहिलो....ट्रेन आली...हळू हळू लोकांनी उतरायला सुरवात केली....बराच वेळानंतर नेहा उतरली....तिने आज मोरपंखी रंगाचा ड्रेस घातला होता...केस मोकळे सोडले होते...कानात मोरपंखी रंगाचेच मोठे रिंग घातले होते...थोडक्यात काय तर ती नेहमीप्रमाणेच खूप सुंदर दिसत होती....मी पटकन तिच्या दिशेने धावलो....तिने मला पाहिलं....
" hi jaan....good morning...मी तुझी झोप disturb केली ना.....sorry..
  its ok shona......आणि मला तर तू केव्हाच disturb  केल आहेस.....त्याची सुरवात ह्याच स्टेशन वर झाली  होती....आठवतंय?
हो..न आठवायला काय झालं...तू नाही का ९:३० ची लोकल पकडायला चक्क सकाळी लवकर उठय्चास....मी पण तुझ्यासाठी जागा पकडून ठेवायचे....
काय मस्त दिवस होते न त शोना ....
hmmmm.... पण आता पण मस्तच आहेत की....आज परत आपण त्याच स्टेशनवर आहोत....वेळ थोडी वेगळी आहे....पण आता आपण जाणार कुठे आहोत.....?
मी परेलला हॉटेल केलाय बुक...
चला मग जाऊया आता...थोडा पडून मग मलाही जायचय अंधेरी ....मग त्यानंतर शॉपिंग पण करायचय...अरे हो आईंना सांगून टाक न...मी पोचले ते...आणि सगळ्यात पहिले .....पाणीपुरी खाऊयात...
नेहा??....पाणीपुरी??  पहाटे ५:३० वाजता? शुद्धीवर आहेस ना?
अरे , असं कुठ लिहलय का की सकाळी ५:३० ला पाणीपुरी खाऊ नये म्हणून?
आग पण ही काय वेळ आहे का?
हे  बघ तुला नसेल खायची तर नको खाऊस, मी खाणारे....पैसे दे मला...
नेहुडी...आग ऐक न जरा...आता नको ना...आपण संध्याकाळी पक्का खाऊयात...
पैसे दे....
मी गुपचूप खिशातून ५० ची नोट काढून दिली आणि नेहाची bag  धरून उभा राहिलो...


  

Wednesday, August 22, 2012

पुन्हा गोष्ट लोकलमधली....४

"मुंबई?, सोना खेचतियेस न माझी?......काये म्हणजे?....
 अरे राजा, तुला मागे एवढा मोठा आवाज येत नाहीये का?... मला काय करायचं तुझी मस्करी करून?
तसं नाही ग राणी...पण आधीच मला जुन्या आठवणींनी कावरबावर केलाय त्यात आजून तुझी मस्करी add  झाली तर मग कसा होईल ?
काही होणार नाही....मी ५ वाजता पाहटे पोहोचतिये  दादरला...तू येतोयेस मला घेयला...
काय?....ठीके मी येतो ५ वाजता दादर....
चल ठेवते फोन आता....सारखा आवाज जातो-येतो आहे....
 बर चल  bye"
 असं म्हणून मी फोन ठेवून दिला.....तेवढ्यात मला समोरच बांगड्या आणि कानात्ल्यांच दुकान दिसलं...मी धावत तिथे गेलो.....तिथे बरीच गर्दी होती....मी तसाच आत घुसलो.....तिथे मस्त मोरपंखी रंगाचे  खडे असलेल्या बांगड्यांचा सेट होता....मी तो उचलला.......त्या दुकानदाराने तेवढ्यात मला टोकल आणि म्हणाला ....
"साब वो बिका हुआ है...आप दुसरा देख लीजिये 
  अच्छा, फिर मुझे ऐसाही दुसरा सेट दे दो भाई 
  इसमे एक हि सेट आता है सरजी...आप कोई दुसरा पसंद करलो 
  क्या भाई तुम भी..किसने लिया है येह्वाला 
 वो साबजी ने..... जो अंदर ड्रेस मटेरीअल देख रहे है"
 तेवढ्यात मला तश्याच प्रकारचे खडे असणारा पण मारून रंगाचा बांगड्यांचा सेट दिसला....मी तो उचलला ...आणि म्हणल 
"ये कितने का है?" 
 ये २८० का है....
क्या? इतना मेहंगा क्यू?
माल देखिये न साब....पुरा गोल्ड प्लेटिंग किया हुआ है....
अच्छा  ठीक है देदो ये"
मी तो सेट घेतला...तेवढ्यात सुरेशचा फोन आला....ते चर्चगेटला पोहचले होते....मी त्यांना बाहेर येयून थांबायला सांगितलं.....आम्ही बाहेर भेटलो....तिथून taxiनी थेट सम्राटला गेलो...तिथे मस्त गुजराथी थाळी मागवली....एवढे सगळे पदार्थ एका ताटात पाहून तो client तर चाटच पडला होता बहुदा....त्याला काय काय खावं आणि कशाबरोबर खावं हे काळतच नव्हत...पाण्याऐवजी ताक देणारे एकमेव हॉटेल असाव असं मला पण वाटत होत...नेहाची आवडती उन्दिओची भाजी होती...तिला आणि मला आवडणारी कढी होती....असा विचार करत असतानाच माझा फोन वाजला..
"हेलो,
हेलो, अरे आई बोलतीये.....नेहा मुंबईला येयला निघालीये...
हो माहितीये मला....तिने फोन केला होता....
आता ती आल्यावरच जां सिद्धिविनायकाला नाहीतर एकटाच जाऊन येशील..
आई हे सांगायला तू इतक्या रात्री फोन केला आहेस?
हो कारण मला माझ्या मुलाबद्दल पूर्ण खात्री आहे....तुझ्या काही हे लक्षात येणार नाही म्हणून आठवण करून देयला फोन केला...जेवण झालं का?
हो आई आताच झालं....
बर मी नेहाला तस सांगितलं आहेच पण परत तुझ्या कानावर घालते...येताना तिच्या आईसाठी छानसी साडी घेऊन या...त्या येणारेत न पुढच्या आठवड्यात...मला आणू नका....खूप साड्या आहेत...
आई आग साडी तिथे नाही का मिळत....
इथे महाग आहे....तू गुपचूप सांगितलेलं कर...नेहा आणेलाच....पण उगाच तिला बोलू नकोस...तिला हवी ती आणि हवी तशी साडी घेऊ दे....
बर बाबा....तुम्ही ना...चल आता ठेवतो....
bye"
 माझं हे सगळ बोलण ऐकून सुरेश गालातल्या गालात हसत होता...मी मात्र आता पूर्णपणे मनाची तयारी केली होती....नेहा येणार होती....म्हणजे आता ती तीची आणि आईची असं दोघींचं शॉपिंग करणार हे नक्की होत.....

     

 


Saturday, August 18, 2012

पुन्हा गोष्ट लोकलमधली....३

"हेलो , अरे सुरेश, आहात कुठे तुम्ही? मी किती वेळापासून चर्चगेटला थांबलोय..?...
अरे,  पोहचतोच आहे रे....दादरला आहे...
ok, मी वेस्टला थांबलोय...बाहेर आलास की फोन कर...."
बर  बर...
फोन बंद करून मी तिथेच स्टेशनवर एक बाकावर बसलो...दोन मिनिट डोळे मिटले...आणि ते जुने दिवस आठवू लागलो....ती ९:४५ ची ठाणे लोकल.....माझी तीच लोकल पकडायची घाई....नेहाच मला त्याच लोकल मध्ये भेटण....सगळ कस आकस्मित होत...कधीही अश्या गोष्टींची अपेक्षा मी केली नव्हती....पण त्या एकामागोमाग एक घडत गेल्या...मग मी काही गोष्टींची अपेक्षा करू लागलो...त्यापण माझ्या मनाप्रमाणे घडू लागल्या...आणि अचानक एक गोष्ट अपेक्षेपेक्षा वेगळी घडली की मी ह्या सगळ्या गोष्टी विसरायचं ठरवलं.....पण आज इथे marine  driveला आल्यावर परत त्या सगळ्या अपेक्षा, आठवणी जाग्या झाल्या...रात्रीच्या सुन्न एकांतात अचानक पैजणांचा आवाज आल्यासारख झाल होत....आवाज तर येत होता पण तो आवाज करणारी पैंजणे मात्र गवसत नव्हती....आयुष्य जणू डिंकासारख झाल होत....वेळेला घट्ट चिटकून बसलेलं....सगळ असूनाही काहीतरी नसल्याची सल सारखी बोचत होती....पण मी हे सगळ मनात कोंडून ठेवलं होत....तेवढ्यात परत माझा फोन वाजला....ह्यावेळी आईचा फोन आला होता...
" हा बोल आई...
   कुठे आहेस? झाली मीटिंग व्यवस्थित ? काही फोन आला नाही म्हणून विचारलं...
   हो मस्त झाली मीटिंग....आता चर्चगेटला आहे...त्या clientला जेवायला घेऊन जायचय न म्हणून थांबलोय....
   बर आरे येताना सिद्धिविनायकाला जाऊन ये रे ...बर्याच वर्षांनी गेलायेस मुंबईला, म्हणून म्हणल सांगाव   खास फोन करून...
     मी जाणारच होतो आई... ठीके ते लोक येतील आत्ता बहुतेक त्यांचाच फोन येतोय...मी करतो परत तुला फोन , ठेवू आता?
     बर बर .....सांभाळून राहा....
    bye..."
फोन  ठेवला....पाहतो तर काय नेहाचे ५ missed call.... मला नेहमी न उलगडलेला प्रश्न आहे की आई आणि नेहा मला एकाच वेळी कसाकाय फोन करतात....
मी परत नेहाला फोन केला...
" हेलो,
  काय हेलो?
  अरे आपली बायको आहे , तिला आपली काळजी आहे , लक्षात आहे की विसरलास? 
अरे सोना , मी  marine driveवर आलोय...म्हणून मी विसरून गेलो ....कारण मी आपल्या जुन्या आठवणीत रमून गेलो होतो...तू आजवरच मला दिलेलं सगळ्यात रोमांटिक गिफ्ट आठवत होतो...
बर बर...आता मस्का पुरे....मला नाही केलास ते ठीक आहे पण आईंना केलास ना फोन?  त्या जास्त काळजी करतात? 
तिचाच आला होता आता फोन जेव्हा तू मला ५  वेळा फोन केलास....तू आहेस कुठे पण....??
ट्रेनमध्ये?
कुठे चाललीयेस?
मुंबई...."