आणि ठरल्याप्रमाणे आम्ही कोल्हापूरला जायला निघालो.....नेहा आधीच पुढे गेली होती...ती जाऊन आधी सगळ्या गोष्टींची पूर्वकल्पना देणार होती....आम्ही आमच्या कारनीच निघालो होतो....कित्तेकवेळा मी कोल्हापूरला गेलो होतो...पण आज रस्ता जरा आपलासा वाटतं होता....बाबांच्या भाषेत खरच घरच्या लक्ष्मिला आणायला आम्ही निघालो होतो...आई बाबा तर खूपच खुश होते...त्यामुळे मीपण खूपच आनंदी होतो...तेवढ्यात फोन वाजला...नेहा म्हणाली...
" कुठे पोचलात?...
सातारा..
ok ....म्हणजे आजून २ तास लागतील....आधी देवीला जाणारात ना?
आई म्हणेल तसं..." मी आईला विचारलं
" आई, आपण आधी देवीला जाणारोत ना?...
हो रे..कोण आहे ?? नेहा का?
हो...ठीक आहे मी सांगतो तिला तसं.."
" हेल्लो, नेहा आम्ही आधी मंदिरात जाणारोत..मी दर्शन वगरे झाला कि फोन करेन.".ठीक आहे ना?
बर...चल bye ...." म्हणून तिने फोन ठेवला...
आम्ही १:३०च तासात कोल्हापुरात पोहचलो...मंदिरात गेलो...फारशी गर्दी नव्हती....देवीला सुंदर मोरपंखी रंगाचा शालू नेसवला होता...आम्ही गेलो आणि आरती सुरु झाली...५ आरत्या म्हणल्यानंतर...आम्हला शंखतीर्थ मिळालं...देवीचं ते रूप पाहून खरच डोळ्याच पारण फिटलं.....आरती मुळे रांग बंद झाली होती ती पुन्हा सुरु झाली...आम्ही गाभार्यात गेलो...आणलेले पेढे देवीसमोर ठेवले...डोळे मिटले...देविला मनापासून एकच सांगितलं...आजवर तू मला नं मागता सगळं काही दिलस..आज आयुष्यातलं सगळ्यात मोठ घेण घेण्यासाठी इथ आलोय...देवी सगळं व्यवस्तीत होऊ दे...नंतर गणपतीचं दर्शन घेऊन आम्ही बाहेर पडलो...आईने कोल्हापुरी चप्पल घेयच ठरवलं होतं...म्हणून बाहेर पडल्यावर समोरच असणार्या दुकानात आम्ही शिरलो..तिथे आधीपासूनच दोन बायका चपला पाहत होत्या...त्यातली एक बाई त्या दुकानदाराला म्हणाली...
" अहो..काय हे जरा देयचा सांगा...मी पुण्याहून आलीये...खास चप्पल घेयला...निट भाव करा...."
आई पण आत गेली, मी बाहेरच थांबलो...नेहाला फोन केला आणि सांगितलं कि आमचं दर्शन झालं..आणि आता थोडी खरेदी करून आम्ही येवूच तुमच्याकडे...ए बाई...तू कल्पना दिलियेस नं घरी..?? ती उत्तर देणार तोच मला आवाज आला?
" वैशू तू?? what a pleasant surprise?....इकडे कशी काय तू..??....तू पुण्याला असतेस ना?..
शैलजा तू..? काय किती वर्षांनी भेटतोय आपण..?? मला फक्त ऐकून माहिती होतं कि तू कोल्हापूरला असतेस..?? काय मग कसं चाललय??..माझ्यामते तुझ्या लग्नानंतर आजच भेटतोय..?? तुझ्या चेहऱ्यात आजून काही फारसा फरक नाही पडलाय..??
हो ना...तुही आजून तशीच आहेस...म्हणुनतर मी इतक्या पटकन ओळखलं..काय मग घरचे सगळे कसे आहेत..?? आणि तुला मुलगा आहे ना?? काय करतो तो सध्या??
आग तो m-tech करतोय..IIT powai मधून.... तुझा मुलगा काय करतोय..?? आणि एक मुलगी पण आहे ना तुला??...
हो ती आता मुंबईत असते...नौकरी करतीये...बर मग आजून तू किती दिवस आहेस इथे...घरी ये...खूप गप्पा मारू...
आग आज लगेच परत जायचंय...एकांकडे आता जायचंय तिथून परत पुणे..पुढच्यावेळी नक्की येयीन..
इकडे मी आणि बाबा एकदा घड्याळाकडे आणि एकदा आईकडे पाहत होतो..तिला काय माहिती कोणती मैत्रीण भेटली होती...इथे नेहाकडे जायला उशीर होत होता आणि आई चप्पल पहायची सोडून गप्पा मारत होती...शेवटी आईने गप्पा थांबवून चपला घेतल्या आणि आम्ही नेहाकडे जायला निघालो....पत्ता विचारत विचारत अखेर नेहाकडे पोचलो..तिचा भाऊ आणि त्याचे मित्र बाहेर बसले होते...आमची गाडी दारात थांबताच तो आत गेला...नेहा धावत बाहेर आली...आम्ही आत गेलो..बसलो..नेहानी पाणी वगरे दिलं...आईने तिच्यासाठी काय माहित कधी कोल्हापुरी साज घेतला होता....आमची आई म्हणजे ना एकदम great ......मी विचारलं....
" घर मस्त आहे नेहा....काकू कुठे आहेत??
अरे ति ना जरा तिच्या मैत्रिणीबरोबर बाहेर गेलीये...येयीलच इतक्यात..."
असं म्हणतोच तो रिक्षाचा आवाज झाला...माझ्या मनातली धाकधूक अजूनच वाढली...दोन बायका घरात आल्या....नेहा उठून तिकडे गेली... म्हणाली...
"आई, आग ते लोक आलेत...मी तुझी ओळख करून देते....
हा समीर, हेल्लो काकू.., मी नमस्कार केला..
हे त्याचे बाबा....आणि ह्या त्याच्या आई....असं म्हणून आईने त्यांचाकडे पाहिलं आणि काय एकदम आई हसत म्हणाली..
शैलू तू..?? आग नेहा तुझी मुलगी..??...काय हा योग आहे कि...काय...आग नेहा आणि समीर ह्याचं एकमेकांवर प्रेम आहे..आणि आम्ही नेहाच्या आईवडिलांशी म्हणजेच तुमच्याशी त्याविषयी बोलायला आलो होतो..आणि हे सगळं..मगाशी आपण दुकानात भेटलो...हा सगळा देवीने घडवून आणलेला योग आहे...
खरा आहे वैशू तुझं....नेहानी मला सांगितलं तेव्हा मला वाटलं होतं..कोण आहे हा मुलगा...त्याच्या घरचे कसे असतील आणि असंख्य प्रश्न समोर उभे राहिले होते आणि तुला समोर पाहताच सगळ्यांची उत्तर आपोआप मिळाली...मी खूप खुश आहे...मला हे सगळं मान्य आहे...
मी हे ऐकलं आणि सुटकेचा निश्वास टाकला..मनोमन मी देवीला thnks म्हणलं.....
No comments:
Post a Comment