आता फक्त नेहाचे बाबा भेटायचे राहिले होते....ते स्वभावानी जरा शांत....कमी बोलणारे आणि तापट होते....हे सगळं मला माहित होत पण मी ते आई बाबांना सांगायचं विसरलो होतो.....त्यामुळे जरा धाकधूक होती...आम्ही सगळेच त्यांची वाट पाहत होतो...तेवढ्यात बेल वाजली....काकू दार उघडायला गेल्या....काकांचा driver त्यांची bag घेऊन आत आला....त्याच्या मागोमाग काका mobile वर बोलत आत आले...त्यांची personality च देखणी होती...चेहऱ्यावरून हुशारी झळकत होती....नेहा पूर्णपणे त्यांच्यावर गेली होती....नेहा धावत त्यांच्याकडे गेली...त्यांना कसून एक मिठी मारली..तोपर्यंत त्यांचं फोन वर बोलण झाल होत...ती त्यांना आमच्याकडे घेऊन आली....पहिले तिने माझी ओळख करून दिली...
" बाबा, हा समीर, मी तुम्हाला म्हणाले होत ना तो..मी त्यांना नमस्कार करायला पुढे गेलो....त्यांना वाकून नमस्कार केला....ते शांत उभे होते...काहीच बोलले नाहीत..मला अजूनच परकं असल्यासारखं वाटायला लागल...नेहाची आई पुढे आली....आणि त्या म्हणल्या..
" अहो गम्मत म्हणजे.....समीर हा माझ्या लहानपणच्या मैत्रिणीचा मुलगा आहे....आपल्या सगळ्या शंका दूर झाल्यात आता....मी खूप खुश आहे....
सगळ्या शंका तुझ्या दूर झाल्या असतील माझ्या नाहीत...काका प्रथमच बोलले...आणि गोष्टीत नवीन वळण येणार कि काय असं मला वाटू लागल.....काका पुढ बोलू लागले...
ह्या गोष्टी एवढ्या सोप्या असतात का शैलजा..??.....तुम्ही सगळ्यांनी म्हणजे हद्दच केलीये...मुलं लहान आहेत...त्यांना एक लक्षात येत नाही ....पण तुम्ही मोठी मंडळी पण....मला वाटल नव्हतं...."
तेव्हड्यात माझे बाबा म्हणले...तुम्हाला काय म्हणायचं...स्पष्ट बोला...आम्ही फक्त मुलांच्या हिताचा, त्यांच्या उज्वल भविष्याचा विचार केला, आणि नाही म्हण्यासार्ख काही न तुमच्या मुलीत आहे न माझ्या मुलात....मग काय चुकल असं वाटतंय...."
वातावरण चांगलच तापत होत....आतापर्यंत सगळं अगदी बिनविरोध झाल होत...पण आज मला वाटल फिसकटणार सगळ..कारण असं तडकाफडकी बोलण माझ्या आईला आजीबात आवडत नाही हे मी जाणून होतो...पण ती आजून शांत होती...ती बहुदा वादळापूर्वीची शांतता होती....आणि त्यावर काका म्हणाले...
" अहो चुकल म्हणजे काय?? चुकलच....एवढ्या शुभ क्षणी, एवढी चांगली गोष्ट तुम्ही मला नुसतीच सांगताय....काही मिठाई नाही काही नाही...मुलांच्या लक्षात हे येणार नाही पण तुमच्या तर आल पाहिजे होत ना...." हे ऐकल...आणि सगळ वातावरणच पालटलं...काकांनी जे काही बॉम्ब टाकले होते आल्या आल्या...त्यावरून तरी ते नुसते तापट नाही, कमी बोलणारे नाही....पण मिश्कील होते हे नक्की सिद्ध झाल...त्याच क्षणी त्यांनी नेहाच्या भावाला मिठाई आणायला पाठवलं...त्यांनी मिठाई आणली...तो मिठीचा box घेऊन ते माझ्या बाबांकडे गेले...एक पेढा त्यांना भरवला...आणि हात जोडत म्हणाले...
":गोरे साहेब, मला माफ करा...तुम्हाला वाईट वाटल असेल तर... बाबांनी त्यांचे हात धरले आणि म्हणाले...आहो गम्मत आपल्या माणसात नसते करायची तर मग कोणात....असे म्हणून त्यांनी काकांना मिठी मारली....मग काका माझ्याकडे वळले..आजूनही हे सगळं मला भास आहे असच वाटत होत...ते माझ्या जवळ आले...मला कडकडून मिठी मारली...नकळत त्यांच्या डोळ्यातून एक थेंब माझ्या खांद्यावर पडला...ते म्हणाले...
बाळा, माझ्या आयुष्यातला सगळ्यात अनमोल ठेवा म्हणजे माझी नेहा आहे....तिला खूप लाडानी वाढवलाय...तिला मी आणि मला तिने नेहमी हवं ते दिलय....नं मागता.....पोरा तिला नेहमी अशीच हसती ठेव...नकळत माझ्याही डोळ्यात आश्रू आले...मी सावरत म्हणलो....
" काका., तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा....नेहा आमच्या घरात राणीसारखी राहील...."
आता ह्या सगळ्या प्रकारात मी आईला विसरलोच होतो....तिला हे असली गम्मत वगरे मुळीच आवडत नाही हे मी जम विसरलो....मग काका आईकडे गेले...आणि म्हणाले...
" मला माफ करा...मला तुमच्याकडे हि अशी मजा चालते नाही काही माहित नसताना मी केली...खरच माफ करा..."
आई म्हणाली..." अहो माफी कसली...उलट तुम्ही खरचं आमची चूक आम्हाला दाखवून दिलीत...आनंदात आम्ही पार विसरून गेलो होतो..."
सगळ झाल्यावर...काकुनी स्वयंपाक केला...नेहानी म्हणे मदत केली होती..असो...पण जेवण झकास झाल...आईने नेहाला तिच्यासाठी आणलेला कोल्हापुरी साज दिला...तिचे वडील लगेच म्हणाले...समीर राव तुम्हीच घाला आता तो....मी पुढे गेलो...मला त्यावेळी माझ्या flat वर नेहाला लागलेलं आणि मी तिला हळद लावलेली तेच आठवलं...पण ते इल्लिगल होत...आज मी लीगली नेहाला साज घातला...समीरचा समीरराव व्हायला लागलेला वेळ मात्र अवर्णनीय होता.....
No comments:
Post a Comment