Wednesday, June 8, 2011

गोष्ट लोकलमधली-१७

 मी आणि नेहा दोघही मुंबईला परत आलो...आजून मित्रांना काहीच माहित नव्हत कि आमच्या घरच्या मंडळीना हे सगळ मान्य आहे.....त्यांना नेहा माहित होती.....मी हे सगळ कधी त्यांना सांगतोय अस झाल होत....मी मुद्दामच फोन केला नव्हता कुणाला...मला त्यांना समोरासमोर सांगायचं होत...नेहमीप्रमाणे त्यादिवशी...मी दादरला लोकल पकडली...नेहानी आधीच जागा पकडली होती....ती माझ्यासाठी बेकरीमधून pattice घेऊन आली होती...सध्या माझे खूपच लाड चालले होते काय माहित कसे काय....??.....मी तिला म्हणलं...
" सोना, आज IIT मध्ये चल....सगळ्या मित्रांना सांगायचय  मला...तू असलीस कि मला बर वाटेल...
  आणि माझ्या ऑफिसच काय करू Mr ..??
  सांग काहीतरी कारण... 
  राजा, ते office आहे college नाही....कारण सांगा आणि lecture बुडवा....
 काये सोनू तू एवढंपण नाही का करू शकत...??
  नाही...अरे संध्याकाळी येतेना मी....लवकर येयीन हवंतर...तेवढ करीन तुझ्यासाठी....
  बर...मग मी सगळ्यांना संध्याकाळी lakeside घेऊन येतो...पक्कं तर मग...
  done ..."आमच बोलणं होईस्तोर विक्रोळी आल...
  आज आम्ही जागा सोडून दारात उभ राहिलो होतो..(एकमेकांना धक्का देत)..आम्ही उतरलो...ती ऑफिसला गेली...मी कॉलेजला आलो...मला एवढ खुश कधी कोणीच पाहिलं नव्हत....अगदी रोहितनी  सुद्धा...शेवटी त्याने विचारलच
" काय रे सम्या?? आज काय एकदम खुश स्वारी..?? काय बात काय?? जिंकला कि काय world -cup? रोहित माझ्या आणि नेहाबद्दल बोलायचं तर world - cup म्हणायचा काय तर म्हणे code word ??
मला surprise देयच होत त्याला म्हणून मी काहीच बोललो नाही...पण हि नेहा ना  माझा सगळा पचका करून टाकते...madamनी lunch पासूनच सुट्टी काढली होती...ती IITt पण पोचली होती..तरीही मला काही कळवलं नाही...तिला मी जिथे काम करतो त्या lab चा no माहित होता...सरळ आत शिरली...माझ्या (नशिबाने) सर त्यादिवशी लाब मध्ये बाहेरच होते काम करत होते...ती आत आली...आणि म्हणाली...
" Excuse me सर? can I meet Mr.Sameer?
  मी आतल्या बाजूला samples polishing करत होतो...मला बाहेर हे सगळ चाललय ह्याचा पत्ताच नाही...
  " yeah why not?, but wat shud i tell sameer who has come?? सर म्हणाले...
    नेहा... 
   ओह्ह्ह नेहा...."समीर come here some wants to meet u urgently..."
   मी धावत आलो...मला अपेक्षितच नव्हत नेहा असेल..मी बाहेर आलो...तर काय नेहा...मी जरा अडखळलोच...एका बाजूला नेहा आणि दुसरीकडे सर...आणि मध्ये मी होतो...ह्या नेहाला मी सोडणार नव्हतो तिने हे मुद्दाम केलं होत.....sirana सगळ कळल होत...ते म्हणाले....
"sameer इट्स almost lunch time now...better u take the lady for the lunch..."
  नेहा खुदकन हसली....मी lab मधून बाहेर आलो....नेहाचा हात पकडला...तिला भिंतीकडे नेल...ती ओरडणार तोच....तिच्या तोंडावर हात ठेवला...आणि म्हणल...
"नेहा....काय हे..?? शोभत का तुला?? असा prof shi बोलतात का directly ......तू iitan na ? 
हेहेहेहे....iitan आहे म्हणूनच असा केलं मी..."
तेवढ्यात रोहित वरतून आला...त्याने आम्हाला पाहिलं...आणि उसका शक यकीनमें बदल गया......
तो म्हणाला......
" सम्या अरे आपण Dept मध्ये आहोत...जरा दमानी....
 नेहा लाजली....आम्ही lakesaide ला आलो...ठरल्याप्रमाणे फक्त थोड आधी....बसलो...
 सगळेच आलो होतो....रोहित,राकेश, श्रुती, श्रद्धा, पंकज पण प्रिया नव्हती...आणि मी बोलू लागलो...
"तर मित्रांनो.....तुम्हाला माहित आहेच माझ्या आणि नेहाबद्दल...आम्ही दोघांनी ते घरी सांगितलं...आणि आनंदाची बातमी म्हणजे ते आमच्या दोघांच्या घरी मान्य आहे .....हे मला तुम्हाला समोरासमोर सांगायचं होत..."
आम्हाला माहितीये...पण नुसता काय संग्तोयेस? we all want treat...but before that a small gift from us...for u and ur sona...त्यांनी नेहाला अंगठी आणली होती...आणि ती आता मी तिच्या बोटात घालायची होती...ती अंगठी हातात घेतली....सगळे आधीचे दिवस आठवू लागले...माझ उशिरा उठण, दादर स्टेशनवरची घाई, मित्रांना भेटण्याची जबर ओढ...आणि शेवटी ती ९:३०चि लोकल...ती अंगठी मी नेहाला घातली...गोष्ट संपल्यासारख वाटू लागल... 

No comments:

Post a Comment