Saturday, June 11, 2011

आधार...

शिरगाव....कोकणातलं एक छोटस गाव...हिरवीगार झाड, सुपारीची बाग...नारळाच्या झाडाचे उंचच उंच  खांब...आम्हाला आपले cement -concrete चे खांब बघायची सवय...त्यामुळे आम्हाला हे सगळ हवंहवस वाटत होत...नुकतच उन्हाळ्यानी कात टाकली होती....पाउसाच्या सरींनी आम्ही पार चिंब झालो होतो...निमित्त होत माझ्या मित्राच्या बहिणीच लग्न..म्हणून सुट्टी काढून आम्ही सगळे मित्र इथे आलो होतो...मला पहिल्यापासूनच कोकण आणि तिथल्या लोकांच आकर्षण होत....मित्रांनी बोलाव्ल्य्वर मी त्याच क्षणी त्याला हो म्हणल आणि सुट्टी टाकली... 
आम्ही त्यादिवशी पहाटेच बसने निघालो....वात्तावरण खूपच ढगाळ झाल होत....मला कधीनव्हे ते खिडकीची जागा मिळाली होती...मला प्रवास करायला फारसा आवडत नाही...पण मला निसर्ग पहिला खूप आवडत...बसचा वेग अपेक्षेपेक्षा खूपच बरा होता....एक २ तासंनातार त्याने एका धाब्यावर बस थांबवली चहाचा सुंदर वास येत होता....मी पक्का चहा प्रेमी असल्याने मला तो पटकन आला...चहाबरोबर प्रत्येकाने पोहे घेतले..गप्पांच्या नादात १ तास गेला...बस सुटली...जसा जसा कोकणाचा घात जवळ येवू लागला तसा तसा पाऊसाचा जोर वाढू लागला....पाउसाचे टपोरे थेंब खिडकीतून आत येयला सुरुवात झाली होती....बसचा वेग जरासा मंदावला होता...घाटात गाडी जात्तच पाउसाचा जोर इतका वाढला कि समोरच काहीच दिसेनास झाल..त्या driver च्या सतर्कतेमुळ आणि आमच्या बलवत्तर नाशीबामूळ ६ तासच अंतर बरोबर आमी १० तासात पार केल आणि शिरगावला पोचलो...तिथे जाताच लगेच घरीपण पोचलो...प्रथमच मी वाडीमध्ये राहणार होतो....घराच्या समोरच दोन मोठी आंब्याची झाड होती.....आम्ही घरात गेलो...माझ्या मित्रानी त्याच्या घरच्या सगळ्यांच्या ओळखी करून दिल्या.....त्यादिवशी प्रथम मी तिला पाहिलं....     



No comments:

Post a Comment